हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केलीय. निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना 24 तासांसाठी प्रचारबंदी केली आहे. पुढील 24 तास ममता बॅनर्जी निवडणुकीत प्रचार करु शकणार नाहीत. 12 एप्रिल रात्री 8 पासून ते 13 एप्रिल रात्री 8 पर्यंत ममता बॅनर्जी यांना कोणत्याही प्रकारे निवडणूक प्रचारात सहभागी होता येणार नाही
निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन करत ममता बॅनर्जी यांनी केलेल्या एका वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ही कारवाई केलीय. तसंच निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांनी केलेल्या वक्तव्याची तीव्र शब्दात निंदा केली आहे. निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात ममता बॅनर्जी यांच्या काही वक्तव्याचा उल्लेख करण्यात आलाय. त्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर प्रचारबंदीची कारवाई करण्यात आल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलंय.
When you can’t beat us. You ban us. #BlackDayForDemocracy pic.twitter.com/REZgWqwF84
— Derek O'Brien | ডেরেক ও'ব্রায়েন (@derekobrienmp) April 12, 2021
निवडणूक आयोगाचा हा निर्णय चुकीचा असल्याचं तृणमूल काँग्रेसनं म्हटलंय. तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी 12 एप्रिल हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचं म्हटलंय. यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. निवडणूक आयोगावर निशाणा साधताना MCC चं नाव मोदी कोड ऑफ कंडक्ट ठेवा अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली होती. तसं एक ट्वीट ममता बॅनर्जी यांनी केलं होतं.
वर्धमान इथं आयोजित प्रचार रॅलीत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं. ममता बॅनर्जी केंद्रीय यंत्रणांविरोधात कार्यकर्त्यांना भडकावण्याचं काम करत आहेत. दीदी तुम्हाला राग काढायचा तो माझ्यावर काढा, मला शिव्या घाला, अशा शब्दात मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.