पवार साहेबांचे सरकार आहे तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाही : गायक आनंद शिंदे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला

पंढरपूर | त्यांना सांगायचे मला तुम्ही चिडवत आहे आम्ही चिडणार नाही, तुम्ही लय काय करताय तसं काय होणार नाय, तुम्ही रडवत आहे पण आम्ही रडणार नाय, हे पवार साहेबांचे सरकार आहे तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाही असे म्हणत गायक आनंद शिंदे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारसभेत गायक आनंद शिंदे यांनी विरोधकांच्यावर तोफ डागली. यावेळी आमदार रोहित पवार उपस्थित होते. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक चांगलीच रंगात आल्याचे दिसून येत आहे. येथील मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी तसेच भाजपाचे दिग्गज नेते प्रचारसभा घेऊन तुफान आरोपांच्या फैरी झाडत आहेत.

भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचार सभेत सरकार केव्हा पाडायचं ते मी बघतो असे म्हटले होते. यावर हे सरकार पवार साहेबांचं आहे तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाही असा टोला गायक आनंद शिंदे यांनी दिला आहे.

You might also like