निवडणुकीचा बिगूल वाजला : सातारा जिल्हा बॅंकेसाठी सोमवारपासून अर्ज दाखल होणार

DCC Bank satara
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. त्यानुसार सोमवारपासून दि.18 ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 21 नोव्हेंबर रोजी 21 जागांसाठी मतदान होणार आहे.

सातारा जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर कोल्हापूर आणि पुणे बँकेसंदर्भात उच्च न्यायालय याचिका दखल झाल्यामुळे निवडणूक कार्यक्रम लांबणीवर पडला होता. अखेर आज दि. 18 रोजी शनिवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. सोमवारपासून हा निवडणूक कार्यक्रम सुरू होत आहे. दि. 18 ते 25 अर्ज दाखल करणे. 26 ऑक्टोबर रोजी अर्ज छाननी, आणि 27 रोजी उमेदवार यादी प्रसिद्ध होणार आहे.

27 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. 11 नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते 5 या वेळेत मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.