हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीना कंटाळून अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. ग्राहकांची वाढती मागणी पाहून अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपलया इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. परंतु आता या गाड्यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. भारत सरकार इलेक्ट्रिक वाहनांसाठी देण्यात येणारी 40 टक्क्यांची सबसिडी कमी करून आता 15 टक्क्यांवर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक्सची किंमत आता वाढू शकते.
भारी उदयोग मंत्रालयाने एक उच्चस्तरीय अंतर मंत्रालयीन पॅनलला एक शिफारीश केली आहे जे याबाबत अंतिम निर्णय घेतील. जर वाहनांवरील सबसिडी कमी करण्यात आली तर भारतातील इलेक्ट्रिक दुचाकींची किंमतही वाढेल. सरकार दुचाकींच्या प्रसारासाठी उपलब्ध पैश्यांमध्ये अधिक वाहनांना फंडिंग करण्याचा विचार करत आहे . त्याच प्रमाणे अनुपयोगी तीन चाकी वाहनांसाठी उपयोगात आणली जाणारी सब्सिडीतील रक्कम दुचाकी साठी उपयोगात आणली जाते. हि योजना जर अंमलात आणली तर याचा परिणाम खरेदीदाराच्या खिश्यावर पडेल.
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सहाय्यता केलेली 10 हजार कोटींची सुरु केलेली फास्टर एडॉप्शन अँड मॅनुफॅकचर ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स इन इंडिया (फेम इंडिया) योजना आहे. ह्या योजनेत तीन चाकी वाहनांसाठी वापरला जाणारा निरुपयोगी 1000 कोटी रुपयांचा फंड वापरून 3500 कोटी पर्यंत करण्याची योजना आहे . योजनेतील रक्कमेचे वाटप वाढवून प्रति युनिट सबसिडी कमी करण्याची शक्यता आहे. जर सद्य स्थितीला सुरु असलेली सबसिडी वाटप सुरु ठेवले तर पुढच्या दोन महिन्यात उपलब्ध फंड संपण्याची शक्यता आहे. फेम इंडिया स्थित एका अधिकाऱ्याच्या माहिती नुसार इलेक्ट्रिक वाहनांची सबसिडी कमी केल्यानंतरही 10 लाख दुचाकींसाठी फेब्रुवारी 2024N पर्यंतच फेम इंडिया मदत करू शकते. ज्यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर परिणाम होऊ शकतो.
उपलब्ध माहिती नुसार हि बातमी प्रकशित करण्यात आली आहे हॅलो महाराष्ट्र सदर बातमीची पुष्टी करत नाही. सदर माहिती उपलब्ध बातमीनुसारच अपडेट करण्यात येईल .