Electric Scooter : Ola Vs Bajaj Vs Ather; कोणती गाडी Best? पहा Full Comparison

Electric Scooter Ola Vs Bajaj Vs Ather Comparison
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल- डिझेलच्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक गाड्यांकडे (Electric Scooter) वळत आहे. वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उतरवल्या आहेत. यामध्ये Ather, Bajaj, Ola यांसाख्या टॉपच्या कंपन्यांचा समावेश आहे. तुम्ही सुद्धा नवीन इलेक्ट्रिक स्कुटर घेण्याचा विचार करत असाल मात्र नेहमी Ather ची घेऊ की Bajaj .. का Ola ची घेऊ ?असा गोंधळ तुमच्या मनात निर्माण होत असेल तर आज म्ही तुम्हाला या गाड्यांची किंमत, बॅटरी पॅक आणि रेंज याबद्दल सांगणार आहोत. त्यानंतर तुम्हीच ठरवा कि तुमच्यासाठी कोणती गाडी Best आहे ते…

Electric Scooter Ola

बॅटरी पॅक आणि रेंज –

OLA S1 मध्ये 3.97 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. होम चार्जिंग द्वारे ही बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी 6 तासांचा वेळ लागतो, तर फास्ट चार्जिंगच्या मदतीने अवघ्या 18 मिनिटांत 75 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येते. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर OLA S1 ही इलेक्ट्रिक स्कुटर (Electric Scooter) तब्बल 180 किलोमीटरपर्यंत धावू शकतो. त्याच वेळी या स्कुटरला 115 किलोमीटर प्रति तास इतके स्पीड मिळते .

नवीन Ather 450X Gen 3 मध्ये 3.6 kWh चा बॅटरी पॅक आहे. होम चार्जिंगसह बॅटरी 100% चार्ज होण्यासाठी जवळपास 5 तास 40 मिनिटे इतका वेळ लागेल. कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर 146 किमीची रेंज देण्यास सक्षम असेल. या इलेक्ट्रिक स्कुटरला 80 किलोमीटर प्रतितास टॉप स्पीड मिळते. आणि अवघ्या 3.3 सेकंदात ही स्कुटर 0 ते 40 किलोमीटर प्रतितास पर्यंत वेग पकडू शकते.

बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर 3 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकद्वारे समर्थित आहे. या इलेक्ट्रिक स्कुटर मध्ये इको आणि स्पोर्टचे असे 2 राइडिंग मोड मिळतात. एकदा फुल्ल चार्ज केल्यांनतर बजाज चेतक इको मोडमध्ये 95 किमी आणि स्पोर्ट मोडमध्ये 85 किमीपर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे.

Electric Scooter Bajaj Cheatk

फीचर्स – (Electric Scooter) 

Ather 450X च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात 7.0-इंचाची टचस्क्रीन प्रणाली, पुढील आणि मागील डिस्क ब्रेक्स, 12-इंच अलॉय व्हील, एक टेलिस्कोपिक काटा मिळतो. तसेच ऍप्रॉन-माउंटेड LED हेडलाइट, फ्लॅट फूटबोर्ड, फ्लश-फिटेड साइड स्टँड, डिझायनर मिरर, स्टेप-अप सीट्स आणि LED टेललॅम्प देण्यात आले आहेत.

OLA S1 pro ही स्कूटर (Electric Scooter) 7.0-इंच TFT टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑल-एलईडी लाइटिंग सेटअप आणि ब्लॅक-आउट व्हीलसह सुसज्ज आहे. या स्कुटरला ब्रेकिंग आणि सस्पेन्शन साठी डिस्क ब्रेक आणि मागच्या चाकाला मोनो सस्पेंशन दिलेले आहे. याशिवाय OLA S1  मध्ये LED इल्युमिनेशन, 36 लीटर अंडर सीट स्टोरेज,स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथ, GPS, वायफाय कनेक्टिव्हिटी यांसारखी वैशिष्ठ्ये मिळतात.

बजाज चेतक एलईडी हेडलॅम्प आणि टेल लॅम्प्स, फुल्ल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टॅन रंगीत सीटिंग आणि डिस्क ब्रेक असे फीचर्स मिळतात. याशिवाय ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, अॅप- बेस्ड कंट्रोल, GPS नेव्हिगेशन, कीलेस इग्निशन यासारख्या सुविधा सुद्धा या स्कुटर मध्ये उपलब्ध आहेत.

Electric Scooter Ather

किंमत किती ?

तिन्ही गाड्यांच्या (Electric Scooter) किमतीबाबत सांगायच झाल्यास, Ather 450 X ची किंमत 1 लाख 29 हजार (एक्स-शोरूम-दिल्ली) आहे. Ola S1 pro ची किंमत 1,10,149 रुपये आणि बजाज चेतकच्या प्रीमियम एडिशनची किंमत 1,51,910 रुपये (एक्स-शोरूम, बेंगळुरू) पासून सुरू होते.