Electric Scooter : ‘या’ कंपनीने लॉन्च केली दमदार Electric Scooter; 172 किमी रेंज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक (Electric Scooter) वाहनांकडे वळला आहे. त्याचाच परिणाम म्हणजे गेल्या वर्षभरात अनेक वाहन निर्माता कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने बाजारात लॉन्च केली आहेत. याच पार्श्वभूमीवर स्पॅनिश कंपनी SEAT ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे, या इलेक्ट्रिक स्कुटरचे नाव Mo 50 असे आहे. SEAT Mo 50 ही कंपनीची दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. कंपनीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Mo 125 होती, जी या वर्षी नोव्हेंबरमध्ये लॉन्च झाली होती.

Electric Scooter

172 किमी मायलेज –

SEAT Mo 50 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 5.6 kWh बॅटरी आणि 7.3 kW इलेक्ट्रिक मोटर आहे. ही मोटर 9.7 bhp पॉवर जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की एकदा फुल्ल चार्ज केल्यांनतर ही इलेक्ट्रिक स्कुटर 172 किमीपर्यंत धावू शकते. (Electric Scooter) यामध्ये सिटी, स्पोर्ट आणि इको असे ३ मोड समाविष्ट आहेत. यात मागील बाजूस प्री-लोडेड अॅडजस्टेबल मोनोशॉक आणि समोरील बाजूस टेलिस्कोपिक फॉर्क्स आहेत. ब्रेकिंगसाठी दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

Electric Scooter

किंमत- (Electric Scooter) 

सध्या कंपनीने आपल्या SEAT Mo 50 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत जाहीर केलेली नाही. ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतात 2023 मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. भारतीय बाजारपेठेत लॉन्च (Electric Scooter) केल्यानंतर, ही इलेक्ट्रिक स्कूटर  TVS iQube, Bajaj Chetak, Ola S1 आणि Ather 450X ला तगडी फाईट देईल.

हे पण वाचा :

Cheapest Electric Scooters : या आहेत सर्वात स्वस्त Electric Scooters; स्पीड आणि मायलेजही जबरदस्त

लवकरच लॉन्च होणार स्वस्त Electric Bike, एका चार्जिंगमध्ये मिळेल 135KM रेंज

BMW Electric Scooter : BMW घेऊन येतेय Electric Scooter; दमदार लूक अन् जबरदस्त मायलेज

Ola Electric Bike : E- Scooter नंतर OLA आणणार इलेक्ट्रिक Bike; कधी होणार लॉन्च?