हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात इलेक्ट्रिक (Electric SUV) वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर बेंगलोर बेस्ड स्टार्टअप Pravaig कंपनी लवकरच आपली नवीन इलेक्ट्रिक SUV भारतीय बाजारपेठेत सादर करणार आहे. इलेक्ट्रिक कारचे वैशिष्ठ्य म्हणजे एकदा फुल्ल चार्ज केल्यांनतर ही गाडी ५०० किलोमीटर पर्यंत धावू शकते.
तुम्ही इंजिनिअर असाल तर इथे मिळवा नोकरी : www.careernama.com
मिळालेल्या माहितीनुसार, 25 नोव्हेंबरला कंपनी ही नवीन SUV लॉन्च करणार आहे. त्यानंतर काही दिवसांनी ही इलेक्ट्रिक कार (Electric SUV) विक्रीसाठी उपलब्ध होईल. कंपनीने अलीकडेच एक टीझर जारी करून याबाबतची माहिती दिली आहे. गाडीचा लूक इतर प्रीमियम SUV सारखा असेल. यामध्ये ट्विन सनरूफचाही वापर केला जाऊ शकतो. SUV चे टेल लाईट्स दोन्ही बाजूंना जोडलेले आहेत.
सिंगल चार्जमध्ये 500 किमी रेंज- (Electric SUV)
कंपनी आपल्या या पहिल्या इलेक्ट्रिक SUV मध्ये जबरदस्त रेंज देणार आहे. असं म्हंटल जात आहे ही सिंगल चार्ज मध्ये ही कार (Electric SUV) तब्बल ५०४ किलोमीटर अंतर पार करू शकते. म्हणजेच तुम्ही मुंबईहून साताऱ्याला जायचं म्हंटल तरी हे अंतर तुम्ही जाऊन येऊन पार करू शकता. Pravaig इलेक्ट्रिक SUV 200 kmph पेक्षा जास्त वेगाने धावू शकते असा दावा केला जात आहे. यासोबतच ही SUV फक्त 4.3 सेकंदात 0-100 किमीचा वेग वाढवण्यास सक्षम असेल. या इलेक्ट्रिक SUV ची चार्जिंग क्षमताही उत्तम असून ती फक्त 30 मिनिटांत 80 टक्के चार्ज होऊ शकते.
सध्या मार्केटमध्ये Pravaig च्या या इलेक्ट्रिक कारचा थेट सामना चीनी कंपनीच्या BYD-ATTO 3 शी होईल. याचे कारण म्हणजे BYD-ATTO 3 ही इलेक्ट्रिक कारही तब्बल 521 किमी रेंज देते. या गाडीची किंमत अजून तरी जाहीर करण्यात आलेली नसली तरी कंपनीने तिची बुकिंग सुरू केली आहे. ATTO 3 ची डिलिव्हरी 2023 च्या सुरुवातीला सुरू होईल असे म्हटले जाते.
Prevaig Dynamics Job Vacancy :
https://careernama.com/engineering-jobs-opening-in-praivaig-dynamics/