ओव्हरटेक करणे आले अंगलट! भरधाव बसची ट्रकला धडक होऊन भीषण अपघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बडोदा : वृत्तसंस्था – गुजरातमधील बडोद्याजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात (accident) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 15 जण जखमी झाले आहेत. या अपघातातील (accident) जखमींना उपचारांसाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काय घडले नेमके?
अपघातग्रस्त बस मुंबईहून राजस्थानमधील भीलवाडा या ठिकाणी जात होती. हि भरधाव बस बडोद्याजवळ पोहोचली असता ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हि बस ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात (accident) एवढा भीषण होता कि, यामध्ये बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बसच्या ड्रायव्हरच्या बाजूचा भाग पूर्णपणे कापला गेलाा आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर ट्रक उलटला
पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वेवर खोपोली एक्झिटजवळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक मुंबई लेनवरून थेट पुणे लेनवर गेला त्याच वेळेस मुंबईवरून पुण्याकडे जाणाऱ्या टँकरला धडक होऊन हा भीषण अपघात (accident) झाला. हा अपघात पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास झाल्याने सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या अपघाताने पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती