हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत अनेक इलेकट्रीक गाड्या आल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे इलेकट्रीक वाहनांना ग्राहकांची पसंती देखील मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता पुढील वर्षी भारतात इलेकट्रीक ट्रॅक्टरही लॉंच होणार आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी ओमेगा सेकी मोबिलिटी (OSM) कंपनीने पुढील वर्षी मार्चपर्यंत भारतात इलेकट्रीक ट्रॅक्टर सहित 10 हजाराहून अधिक इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे.
भारतात प्रथमच लाँच होणार्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरबद्दल सविस्तरपणे सांगताना OSM कंपनीचे चेअरमन उदय नारंग म्हंटल की, “कंपनीने दक्षिण कोरिया आणि थायलंडमध्ये आपली संशोधन-विकास केंद्रे स्थापन केली आहेत. त्या केंद्रांवर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची चाचणी सुरू आहे. ही चाचणी पूर्ण होताच, आम्ही हे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर भारतात लाँच करू. 2022-23 च्या अखेरीस श्रेणी २ आणि ३ शहरांमध्ये या वाहनांची सर्व्हिसिंग आणि भाडेतत्त्वावर देण्याची नवीन संकल्पना देखील आम्ही आणू.
फरीदाबादस्थित कंपनी OSM इलेक्ट्रिक तीन चाकी वाहने बनवते. याशिवाय छोटी व्यावसायिक वाहनेही कंपनी बनवतात. बाजारातील मागणी पाहता त्यांची कंपनी लवकरच ड्रोन, ट्रॅक्टर आणि दुचाकी बाजारात आणणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. एकीकडे देशात पेट्रोल डिझेलच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत असताना जर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर भारतात लॉन्च झाल्यास शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.