हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेस्ला कंपनीचे प्रमुख आणि स्पेसएक्सचे संस्थापक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी एक इतिहास रचला आहे. ते जगातील 400 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेले पहिले व्यक्ती बनले आहेत. तसेच ब्लूमबर्ग बिलियनेअर्सच्या अहवालानुसार, मस्क यांची सध्याच्या घडीला संपत्ती 447 अब्ज डॉलर्सवर पोचली असून त्यांनी नवा विक्रम तयार केला आहे . त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
तब्बल 62.8 अब्ज डॉलर्सची वाढ –
मस्क यांनी दुसऱ्या क्रमांकावरील जेफ बेझोस जे कि अमेझॉनचे संस्थापक आहेत , यांनाही मस्क यांनी मागे टाकले आहे. यांच्या तुलनेत मस्क यांची संपत्ती सुमारे 200 अब्ज डॉलर्सने जास्त आहे. एका दिवसात त्यांच्या संपत्तीत तब्बल 62.8 अब्ज डॉलर्सची वाढ झाली, ज्याचा मुख्य भाग स्पेसएक्सच्या शेअर्सच्या वाढीमुळे आहे. 2024 या वर्षात मस्क यांच्या संपत्तीत एकूण 218 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.
टेस्लाच्या शेअर्समध्ये 65% वाढ –
स्पेसएक्सने नुकत्याच घेतलेल्या मोठ्या टप्प्यांमुळे मस्क यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाली आहे. याशिवाय टेस्लाच्या शेअर्समध्येही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे याचा फायदा त्यांना झाला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर टेस्लाच्या शेअर्समध्ये 65% वाढ झाली आहे. वर्ष संपण्यापूर्वी इलॉन मस्क 500 अब्ज डॉलर्सची संपत्ती गाठण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी दररोज 3.50 अब्ज डॉलर्सची संपत्ती वाढ आवश्यक आहे. सध्याच्या गतीने ते लवकरच हा टप्पा गाठण्यास यशस्वी होतील.
मस्क यांचे लक्ष –
इलॉन मस्क यांचे लक्ष केवळ इलेक्ट्रिक वाहन आणि अंतराळ उद्योगांवर नाही तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सोलर एनर्जी, आणि न्यूरोटेक्नॉलॉजी क्षेत्रांवरही आहे. त्यामुळे ते आणखीन प्रगती साधण्यास यशस्वी होतील . त्यांच्या या दूरदृष्टीमुळे ते जागतिक अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख चेहरा ठरले आहेत.