नवी दिल्ली । 2021 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या लिस्टमध्ये पहिल्या स्थानावर असलेले टेस्लाचे सीईओ एलन मस्क,यांनी यावर्षीही दमदार सुरुवात केली आहे मस्कने सोमवारी म्हणजेच 2022 मधील शेअर बाजाराच्या पहिल्याच दिवशी आपल्या कमाईत 33.8 अब्ज डॉलर्स (सुमारे 2.53 लाख कोटी) ची वाढ नोंदवली आहे. मस्कच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीत झालेली वाढ हे यामागील सर्वात मोठे कारण आहे.
ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार, टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांची संपत्ती 304 बिलियन डॉलर्स आहे. मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. गेल्या वर्षी, एलन मस्कची एकूण संपत्ती 340 अब्ज डॉलर्सच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. यादरम्यान त्यांनी अॅमेझॉनचे जेफ बेझोस यांनाही मागे टाकले. यावर्षीही त्यांची बरीच प्रगती होताना दिसत आहे.
टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी वाढ
मस्कच्या संपत्तीत वाढ होण्याचे कारण प्रामुख्याने टेस्लाचे शेअर्स आहेत. टेस्ला शेअर्स सोमवारी 13.5% वाढून 1,199.78 डॉलर्सवर पोहोचले. मस्ककडे टेस्लाच्या सर्व शेअर्सपैकी सुमारे 18% हिस्सा आहे. टेस्लाच्या कार विक्रीत सलग सहा तिमाहीत वाढ होते आहे. यामुळे टेस्लाच्या शेअर्सची किंमत गगनाला भिडली आहे. सोमवारी, कंपनीचा स्टॉक 13.5 टक्क्यांनी वाढून 1,199.78 डॉलर्सवर पोहोचला.
टेस्लाने मॅन्युफॅक्चरिंग वाढवले
मस्कच्या EV मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने 2021 मध्ये जगभरातील डिलिव्हरी सुमारे एक मिलियन युनिट्सपर्यंत दुप्पट केली आहे. केवळ वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीने 3 लाख युनिट्सची डिलिव्हरी केली. रिपोर्ट्स नुसार, Tesla Model 3 आणि Model Y हे अमेरिकन निर्मात्याकडून सर्वात लोकप्रिय EV होते, दोन्हीपैकी 911,208 युनिट्स विकले गेले.
भारतात दाखल होणार
इलेक्ट्रिक कार बनवणारी टेस्ला लवकरच भारतात देखील दाखल होणार आहे. कंपनीने गेल्या वर्षी कर्नाटकातील बेंगळुरू येथे रजिस्ट्रेशन केले होते. यानंतर कंपनी भारतात आयात शुल्कात सवलत देण्याची मागणी करत आहे. मात्र सरकारकडून अजूनही याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.