व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

एलन मस्कला फटका, आता 5 हजार भारतीयांना द्यावा लागणार रिफंड

नवी दिल्ली । एलन मस्कला भारतात मोठा फटका बसला आहे. एलन मस्कची कंपनी स्टारलिंक सॅटेलाइटला कंपनीच्या इंटरनेट डिव्हाईसच्या प्री-ऑर्डर केलेल्या 5000 भारतीयांना पैसे परत करावे लागतील. भारत सरकारने कंपनीला तसे करण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीला भारतात सेवा सुरू करण्यासाठीचा परवाना अजूनही मिळालेला नाही.

स्टारलिंक उपग्रह इंटरनेट उपक्रम हा एलन मस्कच्या स्पेसएक्स एरोस्पेस कंपनीचा भाग आहे. स्टारलिंक जगभरात कमी लेटन्सी ब्रॉडबँड इंटरनेट सेवा देण्यासाठी छोटे सॅटेलाइट लाँच करत आहे. त्याचे लक्ष विशेषत: दुर्गम भागांवर केंद्रित आहे, जेथे पारंपारिक इंटरनेट मिळणे खूप कठीण आहे.

कंपनीने ग्राहकांना पाठवले ई-मेल
वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, Starlink ने भारत सरकारच्या आदेशानुसार कंपनीच्या डिव्हाईसच्या प्री-ऑर्डरची माहिती ग्राहकांना ई-मेलद्वारे देणे सुरू केले आहे. अशाच एकायुझरला पाठवलेला ई-मेल पाहिल्याचा दावा रॉयटर्सने केला आहे. भारतातील 5000 लोकांनी स्टारलिंक डिव्‍हाइस लॉन्‍च होण्‍यापूर्वीच ऑर्डर दिली होती. ग्राहकांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये कंपनीने म्हटले आहे की, रिफंडचा पर्याय ग्राहकांकडे नेहमीच उपलब्ध होता. ते कधीही रिफंडघेऊ शकतात.

कंपनीला परवाना मिळालेला नाही
स्टारलिंक सध्या भारतात व्यावसायिक परवाना मिळविण्यासाठी संघर्ष करत आहे आणि सरकारने अजूनही परवाना मंजूर केलेला नाही. हे पाहता, भारत सरकारने मंगळवारी कंपनीला त्या सर्व लोकांना पैसे परत करण्याचे आदेश दिले ज्यांनी डिव्हाइससाठी प्री-ऑर्डर केली आणि परवाना मिळेपर्यंत पैसे जमा केले.

जानेवारीच्या अखेरीस भारतात परवान्यासाठी अर्ज करण्याचा स्टारलिंकचा मानस आहे. त्याच वेळी, गेल्या महिन्यात, स्टारलिंकच्या भारत प्रमुखाने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले होते की,” कंपनीने डिसेंबर 2022 पर्यंत 200,000 डिव्हाइस विकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.”