Elon Musk ने दोन दिवसांत गमावले 50 अब्ज डॉलर्स, Tesla च्या शेअर्समध्ये झालेली घसरण आहे यामागील कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांची एकूण संपत्ती या आठवड्यात आतापर्यंत 50 अब्ज डॉलर्सनी घसरली आहे. सलग दुसऱ्या दिवशी टेस्ला इंकच्या शेअर्सच्या घसरणीमुळे हे घडले आहे.

ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सच्या इतिहासातील दोन दिवसांतील ही सर्वात मोठी घसरण आहे. मॅकेन्झी स्कॉटपासून 2019 च्या घटस्फोटानंतर जेफ बेझोसने 36 अब्ज डॉलर्स गमावल्यानंतर एका दिवसातील ही सर्वात मोठी घसरण आहे.

टेस्लासाठी गेले काही दिवस चांगले गेले नाहीत. ब्लूमबर्गच्या रिपोर्ट्स नुसार, जेव्हा मस्कने ट्विटरवर त्यांच्या फॉलोअर्सना कंपनीतील त्यांचे 10 टक्के हिस्सेदारी विकण्याबाबत विचारले त्यानंतर ते सुरू झाले. त्यानंतर त्याचा भाऊ किंबल याने शेअर्स विकल्याची बातमी समोर आली.

एलन मस्क आणि जेफ बेझोस यांच्यातील फरक कमी आहे
एलन मस्कच्या संपत्तीत घट झाल्यामुळे ते आणि अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्यातील दरी 83 अब्ज डॉलर्सने कमी झाली आहे. जानेवारीमध्ये, मस्कने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या लिस्टमध्ये पहिल्यांदाच बेझोसला मागे टाकले. या दोन अब्जाधीशांमधील अंतर अलीकडेच 143 अब्ज डॉलर्सने वाढले आहे, जे जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांच्या संपत्तीपेक्षा जास्त आहे.