हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | twitter चे मालक झाल्यानंतर एलोन मस्क यांनी पहिली मोठी घोषणा आहे. मस्क यांनी ट्विटर च्या ब्लु टीक सबस्क्रिप्शन साठी तब्बल 8 डॉलर रक्कम ठेवली आहे. यामुळे ट्विटर ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच याबाबत चर्चा सुरू होत्या अखेर आज मस्क यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
इलॉन मस्क यांनी स्वत: ट्विट करून ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनची किंमत जाहीर केली आहे. ब्लू टिकसाठी वापरकर्त्यांना $8 फी म्हणून द्यावी लागेल. मात्र, प्रत्येक देशानुसार शुल्क वेगवेगळे असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यासोबतच त्यांनी ब्लू सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून लोकांना मिळणारे फायदेही सांगितले आहेत.
Twitter’s current lords & peasants system for who has or doesn’t have a blue checkmark is bullshit.
Power to the people! Blue for $8/month.
— Elon Musk (@elonmusk) November 1, 2022
ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन अंतर्गत, वापरकर्त्याला उत्तर, उल्लेख आणि शोधात प्राधान्य मिळेल, एलोन मस्कच्या मते, या वैशिष्ट्यामुळे, स्पॅम आणि घोटाळ्याला आळा बसेल. याशिवाय यूजर्स आता मोठे व्हिडिओ आणि ऑडिओ पोस्ट करू शकतील.
दरम्यान, एलोन मस्क यांनी अलीकडेच $44 बिलियन मध्ये ट्विटर विकत घेतले. ट्विटरचे मालक झाल्यानंतर त्यांनी पूर्वीचे सीईओ पराग अग्रवाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. आता अशाही चर्चा सुरु आहेत की, एलोन मस्क कर्मचाऱ्यांना दिवसातुन 12 तास आणि आठवड्यातून 7 दिवस काम करायच्या सूचना देणार आहेत.