हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकार इमर्जन्सी अलर्टची चाचणी घेत आहे. सकाळपासून अनेकांच्या फोनवर एक मेसेज येऊन कॉल आल्यामुळे वेगवेगळे संभ्रमण निर्माण झाले आहेत. मात्र असा मेसेज येणे भीतीचे कारण नसून ती एक टेस्ट अलर्ट असल्याचे दूरसंचार विभागाकडून सांगण्यात आले आहे.
आता इथून पुढे भारत सरकारकडून भविष्यात काही महत्वाचे अपडेट म्हणजे अतिवृर्ष्टी,भूकंप, अपडेट अश्या स्वरुपात मिळणार आहेत. म्हणजेच, जर राज्यात अतिवृष्टी किंवा भूकंप अशी स्थिती निर्माण झाली तर भारत सरकारकडून याची पूर्वकल्पना आपल्याला इमर्जन्सी अलर्टच्याद्वारे देण्यात येणार आहे. यामुळे आपण लगेच सावध होऊन उद्भवलेल्या स्थितीचा सामना करु शकणार आहे. सध्या अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे तेथील इंटरनेट कनेक्शन बंद पडले आहे. अनेकांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेऊन नैसर्गिक आपत्तीविषयी नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सरकारने इमर्जन्सी अलर्ट सुरू केले आहे.
यासंदर्भातच आज भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून चाचणी घेण्यात आली आहे. दूरसंचार विभागाने नागपूर आणि इतर शहरांमध्ये अलर्ट चाचणी घेतली. मात्र या अलर्ट चाचणीमुळे संभ्रमण निर्माण होऊन नागरिकांमध्ये गोंधळ उडण्याचा दिसून आले. ही बाब लक्षात येताच विभागाकडून पाठवण्यात आलेला मेसेज डिलीट करण्यात आला.
दरम्यान भविष्यात जर आपल्या फोनवर भारत सरकारकडून अशा पद्धतीचा मेसेज किंवा फोन आला तर त्यावरील सर्व सूचना ऐकून त्याप्रमाणे कृती करावी. सरकार आपल्या संरक्षणासाठी आपल्याला अलर्ट करत असल्याचे आपण लक्षात ठेवावे. तसेच इतरांना देखील यासंबधित माहिती द्यावी.