अडचणीच्या वेळी कामी येतो Emergency Fund, त्यासाठी किती आणि कशी तयारी करावी हे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । अचानक आलेल्या अडचणीत पैशांची व्यवस्था करणे खूप अवघड आहे. अशा वेळी तुम्ही भविष्यासाठी जमा करत असलेल्या पैशांचा वापर करून कठीण प्रसंगातून बाहेर पडू शकता, मात्र ज्या कामांसाठी तुम्ही गुंतवणूक केली होती त्या योजना उद्ध्वस्त होतात. जर तुम्ही एमर्जन्सी फंड जमा केला गेला असेल तर तुम्ही कठीण प्रसंगातून सहजपणे बाहेर पडू शकाल आणि तुमची भविष्यातील गुंतवणूकही योग्यपणे राहू शकेल. त्यामुळे सर्व बचत आणि गुंतवणुकीसोबतच अशी व्यवस्थाही करावी की, जेणेकरुन कोणत्याही आजारामुळे किंवा अपघातामुळे उत्पन्नाचे नुकसान, व्यवसायात किंवा इतर कोणत्याही मार्गाने होणारे नुकसान यातून सहजपणे बाहेर पडता येईल.

ज्याप्रमाणे तुम्ही भविष्यासाठी आर्थिक नियोजन करता आणि त्याचप्रमाणे एमर्जन्सी फंडही तयार केला गेला पाहिजे. आता प्रश्न असा उभा राहतो की, एमर्जन्सी फंड किती असावा आणि तो कसा तयार करावा. यासाठी बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ज्या प्रकारे तुम्ही आपल्या कमाईचा काही भाग सामान्य दिवशी फ्युचर प्लॅनमध्ये गुंतवता, त्याचप्रमाणेचआपल्या कमाईचा काही भाग हा एमर्जन्सीसाठीही जमा केला पाहिजे.

6 महिन्यांचा फंड
एमर्जन्सी फंड तयार करताना हे लक्षात ठेवा की, हा फंड इतर कोणत्याही गरजांसाठी वापरला जाऊ नये. तज्ञांचा असा विश्वास आहे की, कोणताही प्रॉब्लेम हा 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकत नाही. या दिवसात वाईट वेळ एकतर निघून जाते किंवा माणसाला त्यावर मात करण्याचा मार्ग सापडतो.

एमर्जन्सी फंड मंथली सॅलरीच्या किमान 6 पट असावा. तुम्ही तुमची 6 महिन्यांची कमाई एमर्जन्सी फंडसाठी सेव्ह करावी. जर तुम्ही महिन्याला 50 हजार रुपये कमावत असाल तर तुमच्याकडे किमान 3 लाख रुपयांचा एमर्जन्सी फंड असावा. हा फंड तुमच्या बचत आणि गुंतवणुकीपासून वेगळा असावा.

एमर्जन्सी फंड जमा करा
एमर्जन्सी फंड अशा पर्यायात गुंतवावा जिथून तुम्ही सहजपणे पैसे काढू शकाल. एमर्जन्सी फंड रोख स्वरूपात किंवा बचत बँक खात्याच्या स्वरूपात असू शकतो. तुम्ही लिक्विड म्युच्युअल फंडात देखील एमर्जन्सी फंड ठेवू शकता. लिक्विड म्युच्युअल फंडामध्ये, फक्त मनी मार्केट सिक्युरिटीजची गुंतवणूक केली जाते. यामुळे, त्यांच्यामध्ये धोका खूप कमी आहे. तुम्ही FD किंवा RD मध्ये देखील एमर्जन्सी फंड जमा करू शकता.

तुम्ही तुमचा एमर्जन्सी फंड तीन भागात विभागू शकता. हे अल्ट्रा शॉर्ट टर्म, शॉर्ट टर्म आणि मिडीयम टर्म मध्ये विभागले जाऊ शकते. तुम्ही डेट फंडातही गुंतवणूक करू शकता. तुम्ही FD किंवा RD सारख्या योजनांमध्ये देखील एमर्जन्सी फंड जमा करू शकता.

एमर्जन्सी फंडमध्ये वाढ
एमर्जन्सी फंडसाठी फक्त एकदाच पैसे जमा करणे पुरेसे नाही. कारण महागाई सातत्याने वाढत आहे. म्हणून, आपण तयार केलेला एमर्जन्सी फंड कालांतराने वाढवत रहा.

Leave a Comment