हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील नागरिकांना आता पुन्हा एकदा लोडशेडिंगच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. यंदाच्या पावसामुळे वीज निर्मितीचा वेग मंदावला असल्यामुळे राज्यावर लोड शेडिंग करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नागरिकांना रोज अर्धा ते 2 तास लोडशेडिंगमध्ये घालवावे लागणार आहेत. यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे विजेची मागणी जास्त प्रमाणात होत आहे. परंतु या मागणीला मागणीला पुरवण्यासाठी महावितरण अपयशी ठरत आहे. त्यामुळेच राज्यात दोन तास आपत्कालीन लोडशेडिंग करण्यात येणार आहे. ज्यामुळे विजेची बचत होऊन पुरवठा कमी केला जाईल.
लोडशेडिंग करण्याचे कारण
समोर आलेल्या माहितीनुसार, यावर्षी जास्त पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांचा पाण्यासाठी उपसा वाढला आहे. यासाठी विज देखील जास्त जास्त प्रमाणात खर्च करण्यात येत आहे. तर दुसरीकडे पाऊस न पडल्यामुळे राज्यात उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. ज्यामुळे देखील विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा जास्त वापर होत आहे. अशा दोन्ही प्रमुख कारणांमुळे सध्या राज्यात जास्त खर्च केले जात आहे. राज्यातील लोकांची विजेची मागणी वाढल्यामुळे पुरवठा कमी पडू लागला आहे. अशावेळी उपाय म्हणून दिवसाचे दोन तास वीज खंडित करण्याचा म्हणजेच लोड शेडिंग करण्याचा निर्णय महावितरणकडून घेण्यात आला आहे.
…तर लोडशेडिंग आपसूकच बंद होईल.
परंतु जर राज्यात विजेची मागणी कमी झाली. जास्त पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे पाण्याचा उपसा करण्याचे प्रमाण कमी झाले तर विजेचा पुरवठा कमी होऊ शकतो. यानंतर महावितरणाकडून देखील नियमित वीज पुरवठा केला जाईल. जास्त पाऊस आणि मागणी कमी अशी दोन कारणे नियंत्रणात आल्यानंतर लोडशेडिंग आपसूकच बंद होईल. परंतु तोपर्यंत राज्यातील नागरिकांना लोड शेडिंग चा सामना करावा लागणार आहे. तब्बल दोन तास त्यांना विज उपलब्ध करून दिली जाणार नाही.
महावितरणच्या मते, या ऑगस्ट महिन्यात राज्यात पाऊस खूपच कमी झाला आहे. त्यामुळे विजेची मागणी देखील तितकीच वाढली आहे. मागणी झालेली अचानक वाढ आणि वीज पुरवठा यामध्ये त्यामुळेच अंतर निर्माण झाले आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून लोडशेडिंगचा पर्याय वापरल्याशिवाय इतर दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध राहिलेला नाही. मागणी आणि पुरवठा यात दोन ते तीन हजार मेगावॅटचे अंतर आहे. ज्यामुळे काही फीडर्सवर अर्धा ते एक तास लोडशेडिंग करावी लागणार आहे.
कोणत्या भागात लोडशेडिंग
सध्या विजेची मागणी आणि पुरवठा यामध्ये तब्बल 2 ते 3 हजार मेगावॅटचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे, यावर पर्याय म्हणून महावितरणने काही फिडरवर अचानक लोडशेडिंग सुरू केले आहे. नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना बुधवारी लोडशेडिंगचा सामना करावा लागला. तर अमरावती भागात देखील काही तासांसाठी विज कपात करण्यात आली. आता इतर भागात देखील विज पुरवठा खंडित केला जाईल.