जालन्यातील घटनेचे पडसाद!! 7 जिल्हे बंद राहणार; शरद पवार आंदोलकांची भेट घेणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जालन्यातील (Jalna Lathicharge) अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. जालन्यातील घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. आज औरंगाबादमध्येही सकाळीच आंदोलकांनी जाळपोळ करून निषेध नोंदवला आहे. एकूण सर्व या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. जालना लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ मराठा आंदोलकांनी बंदची हाक दिली आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये आज बंद पाळण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले हे आज जालण्यात जाणार आहेत.

कोणकोणते जिल्हे आज बंद राहणार

मराठा आंदोलकांवर कऱण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेध म्हणून आज जालना, बीड, हिंगोली, नंदूरबार, उस्मानाबाद, परभणी आणि लातूरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच अनेक तालुक्यातील कारभारही बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार स्वतः जालन्यात जाणार आहेत आणि आंदोलनस्थळाला भेट देणार आहेत. आज दुपारी जालन्यातुन शरद पवार पत्रकार परिषदही घेतील.

दरम्यान, जालन्यात मराठा उपोषण आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जनंतर आता राज्यभरातून त्यावर प्रतिक्रिया येत आहे. विरोधी पक्षांनी या घटनेवरून थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याना जबाबदार धरलं आहे. गृह विभागाकडुन आदेश आल्याशिवाय असा लाठीमार होत नसतो, जालन्यातील आंदोलन पोलीस प्रशासनामुळे चिघळले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.