हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल वाढलेल्या पायाभूत सुविधा या जरी मानवी जीवनासाठी आरामदायक असल्या तरीसुद्धा त्यांना मानवी जीवन संपवण्यासाठी काही सेकंदाचाच अवधी लागतो. त्यासाठी विमान प्रवास करत असताना ज्याप्रमाणे प्रवाश्यांना सूचना दिल्या जातात. आता त्याचप्रमाणे खाजगी बसेसमध्येही आपात्कालीन सूचना देणे अनिवार्य केले जाणार आहे. राज्य परिवहन विभागाने खासगी बसेस मध्ये प्रवाश्यांना सूचना देण्यासाठीचा मोठा निर्णय घेतला आहे.
नागपूरचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, खासगी बसमध्ये प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता खासगी बसमध्ये विमानात ज्याप्रमाणे एक एअरहॉस्टेज प्रवाश्यांना सुरक्षेबाबत सूचना देतात त्याप्रमाणे बसेसमध्ये प्रवाश्यांना सूचना देणे बंधनकारक होणार आहे. यात मोबाईल क्रमांक, बस कंपनीचा दूरध्वनी क्रमांक, तसेच बसच्या कंडिशनबद्दलची माहिती आणि बसच्या दर्शनी भागात बस चालकाचा फोटो हे सर्व स्टिकर स्वरूपात लावले जाणार आहे.
वाढत असणाऱ्या अपघातामुळे घेतली जातीये खबरदारी
आपल्याला रोज पेपरमध्ये, बातम्यामध्ये कुठे ना कुठे घात- अपघात झाल्याच्या घटना समोर येत असतात. त्यामुळे होणारे नुकसान हे देखील प्रचंड मोठे आहे. त्यासाठी खबरदारी म्हणून व वाढते अपघात रोखण्यासाठी ज्या प्रवाश्यांना आपात्कालीन परिस्थितीत काय करावे हे समजत नाही अश्यांना आणि इतरांनाही खासगी बसेस मध्ये सूचना दिल्या जाणार असल्याचा राज्य परिवहन विभागाने निर्णय घेतला आहे. यामुळे होणारे अपघात टळतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.