1 एप्रिलपासून रजेसाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारणे बंद!! वापरावी लागेल ही पध्दत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांच्या रजेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 1 एप्रिलपासून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना (Government Employees) रजा घ्यायची असल्यास ऑफलाईन नाहीतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज (Online Application) करावा लागणार आहे. यासंदर्भातील आदेश गुरुवारी सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात आले आहेत. यामुळे आता कर्मचाऱ्यांची रजेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची धडपड वाचणार आहे.

राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून ‘ई-एचआरएमएस’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या अंतर्गतच सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची डिजिटल पुस्तक सेवा सुरू करण्यात आली आहे. या नव्या प्रणालीमध्ये अधिनस्थ कार्यालयांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या नव्या प्रणालीवर सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सेवा पुस्तका संदर्भात माहिती भरावी असे आदेश 3 मार्च रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आले आहेत.

महत्वाचे बाब म्हणजे, या नव्या प्रणालीच्यामार्फत अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांना रजेसाठी ऑनलाईन अर्ज पुरवले जाणार आहेत. यापूर्वी शासकीय कार्यालयात रजा घेण्यासाठी कागदपत्रे अर्ज जमा करावे लागत होते. परंतु या नव्या प्रणालीमुळे ऑनलाइन पद्धतीने रजेसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला सुट्टी हवी असल्यास तो ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो. या ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया 1 एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, नव्या प्रणालीमार्फत सरकारने ऑनलाईन पद्धतीने रजेचा अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे आता कोणत्याही कर्मचाऱ्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज जमा करता येणार नाही. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्याकडून ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या नव्या प्रणालीमुळे प्रत्येक एका कर्मचाऱ्याच्या रजेविषयीची माहिती ऑनलाईन सेव राहणार आहे. तसेच कोणता कर्मचारी किंवा अधिकारी किती दिवस सुट्टीवर होता हे देखील एका क्लिकवर समजणार आहे.