अतिक्रमण प्रकरण : चोराडे येथील ग्रामपंचायतीला गटविकास अधिकाऱ्यांचे पत्र

पुसेसावळी | खटाव तालुक्यातील चोराडे येथील ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारा विरोधातील आंदोलनाची पंचायत समिती प्रशासनाकडून दखल घेण्यात आली आहे. गटविकास अधिकार्‍यांचा पुढील आदेश येईपर्यंत कारवाई थांबवण्याचे ग्रामपंचायतीला पत्र दिल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेत प्रशासनाने घेतलेल्या निर्णय‍ाचे स्वागत केले.

याबाबत अधिक म‍हिती अशी की, ग्रामपंचायत सरपंच हे राजकिय द्वेशापोटी काही ठराविक लोकांना लक्ष करुन स्वत:च्या कार्यकर्त्यांना अभय देवून फक्त ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात असलेल्या लोकांवर अतिक्रमणाबाबत नोटिस काढून असलेले व्यवसाय उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करित आहेत. तरी चोराडे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य (उपसरपंच) सुधाकर शंकर कुंभार व काही ग्रामस्थांनी पत्र्याचे गाळयाचे अतिक्रमण केले असून त्य‍ांना ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढणेबाबत एक नोटीस दिले होते. परंतु तद्नंतर ग्रामपंचायती कडुन त्याच्यावर कोणतीही कारवाईबाबत नोटीस पाठवणेत येत नाही. फक्त विरोधातील गाळे धारकांवर राजकीय द्वेशापोटी कारवाईच्या तीन तीन नोटीसी पाठवल्या आहेत. तसेच गाळे काढलेसाठी पोलीस बंदोबस्त मागणी बाबत पाठपुरवठा केला जात आहे. त्याबाबतची कारवाई थांबवण्यात यावी.

तरी ग्रामसभेत गावातील सर्व पत्र्याच्या गाळयाचे अतिक्रमण काढण्याचा ठराव झाला आहे. तर सरपंच यांनी सर्व गाळे धारकांवर नोटीस काढायला हवी होती. परंतु विरोधात गेलेल्या गाळे धारकांवर सरपंच अधिकाराचा चुकीच्या पद्धतीने
वापर करित आहेत. तरी सरपंच याचेवर कारवाई करावी. तरी ग्रामपंचायतीने स्मशानभूमी जवळ बांधलेले गाळे ज्यांना भाडेतत्त्वावर दिले आहेत. त्यांनीही त्या गाळयासमोर पत्र्य‍ाचे शेड उतरुन अतिक्रमण केले. त्यावरही कारवाई करावी अन्यथा आम्हास २६ जानेवारी दिवशी ग्रामपंचायती समोरच आत्मदहन आंदोलन करावे लागेल. अशा मागण्याचे पत्र आंदोलकांकडून पंचायत समितीचे अधिकारी ए. एन.बनसोडे यांना आंदोलनस्थळी देण्यात आले आहे. यावेळी सचिन पिसाळ, अभिजित पिसाळ, धनाजी पिसाळ, बापुराव पिसाळ, भाऊसो पिसाळ, सुनिल पिसाळ, शांताराम पिसाळ, नवनाथ पिसाळ, प्रशांत पिसाळ, विजय पिसाळ, श्रीकांत पिसाळ, राजाराम पिसाळ, विलास पिसाळ, अक्षय पिसाळ, संजय अवघडे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधि. नियम कलम ५३ (४ पो.क.२ अ) नुसार ग्रामपंचायतीस हे अतिक्रमण काढण्याचा अधिकार राहिलेला नाही. कारण सदर ग्रामपंचायतीने २७/ ०७ /२०२० रोजी नोटीस दिले होते. मात्र य‍ावरची कारवाई थांबवली होती. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पुन्हा नव्याने २६/११/२०२१ ला राजकीय द्वेशापोटी ठराविक व्यक्ती विरोधात आकसाने कारवाई चालु केली आहे. तेव्हा ग्रामपंचायत सरपंच चुकीच्या पद्धतीने अधिकाराचा गैरवापर केला म्हणुन कठोर कारवाई करावी अशी म‍ागणी आंदोलकांनी केली.

उपसरपंचानी अतिक्रमण केल्याने सदस्यत्व रद्द करावे : अभिजित पिसाळ

विद्यमान ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुधाकर शंकर कुंभार यांनी सुद्धा अतिक्रमण केलेले आहे. तरी याबाबत चौकशी करुन ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्य‍ाची कारवाई करावी. अशी म‍ागणी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचेकडे केली असल्याचे आंदोलक अभिजित पिसाळ यांनी सांगितले.