मुंबई : हॅलो महाराष्ट्र – इंग्लंडच्या वनडे आणि टी 20 टीमचा कॅप्टन ईऑन मॉर्गनने (Eoin Morgan) नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. इंग्लंडने ईऑन मॉर्गनच्या (Eoin Morgan) नेतृत्वात इंग्लंडने 2019 मध्ये पहिल्यांदा क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला. ईऑन मॉर्गन (Eoin Morgan) फक्त यशस्वी कॅप्टनच नव्हे, तर तो यशस्वी फलंदाजही होता. कालच मॉर्गन निवृत्त होणार, अशी ब्रिटीश माध्यमांमध्ये चर्चा होती. आज 28 जूनला इंग्लंडच्या या दिग्गजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
गेल्या काही काळापासून मॉर्गन मॉर्गनचा (Eoin Morgan) फॉर्मसाठी संघर्ष सुरु होता तसेच तो दुखापतींशीही त्याची झुंज सुरु होती. त्यामुळे तो लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्ती घेतली असली तरी स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळणं तो सुरुच ठेवणार आहे. हंड्रेड स्पर्धेत तो लंडन स्पिरिट या संघाचं नेतृत्वही करणार आहे.
वनडे मध्ये मॉर्गनच इंग्लंडचा खरा हिरो
एलिस्टर कुकच्या जागी 2015 मध्ये ईऑन मॉर्गनची (Eoin Morgan) कॅप्टनशिपपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्याने आतापर्यंत 126 वनडे आणि 72 टी 20 सामन्यामध्ये त्याने इंग्लंडच नेतृत्व केलं. त्याच्याच नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ 2016 टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचला. 2019 मध्ये मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला. इंग्लंडमधूनच क्रिकेटची सुरुवात झाली. पण इंग्लंडलाच क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकता येत नव्हता. वारंवार विश्वचषक त्यांना हुलकावणी देत होते. अखेर मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने पहिल्या वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला.
हे पण वाचा :
शिवसैनिक आक्रमक!! श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले
आम्ही शिवसेनेचेच सदस्य, काँग्रेस- राष्ट्रवादीनेच सेनेला हायजॅक केलं
हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा; मुख्यमंत्र्यांचा शिंदेवर हल्लाबोल