हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | युरोपमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. युरोप मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून कोरोना कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे युरोपातील (Europe) देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सर्वप्रथम जर्मनी आणि फ्रान्स मध्ये लॉकडाउन करण्यात आले होते. तर स्पेनमध्येही यापूर्वीच लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. आता इंग्लंडमध्येदेखील पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी शनिवारी कडक लॉकडाऊनची घोषणा करत सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
यूकेमध्ये (UK) कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 1 मिलियन (10 लाख) होताच पीएम जॉनसन यांनी अचानक लॉकडाऊनची घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, आता व्यापार (Business) आणि देनंदिन जीवनावर (Daily Life) कडक नियम लावण्यात आले आहेत. हा लॉकडाऊन गुरुवारी सुरु होईल आणि 2 डिसेंबरपर्यंत लागू असेल.
एका न्यूज कॉन्फरन्समध्ये बोलताना पंतप्रधान जॉनसन म्हणाले की, कोणताही जबाबदार पंतप्रधान कोरोनाच्या गंभीर आकडेवारीकडे दुर्लक्ष करु शकत नाही. देशात कोरोनाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन नाही झालं तर देशात दररोज हजारो लोक प्रमाण गमावतील. यापूर्वीच लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हजारो लोक रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे. त्यापैकी काहींची अवस्था गंभीर आहे. आपला देश अजून मृत्यू पाहू शकत नाही.
इंग्लंडमधील नवीन लॉकडाउन नियमांनुसार आता बार आणि रेस्टॉरंट्समध्ये केवळ टेक-आउट सेवा उपलब्ध असेल. अनावश्यक दुकाने बंद राहतील, व्यायामासारख्या आणखी काही आवश्यक कामांसाठीच लोक घराबाहेर पडू शकतील. केस कापण्यापासून बाहेर फिरण्यापर्यंत अनेक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे, असे जॉनसन म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’