Eoin Morgan : इंग्लंडला विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार लवकरच घेणार निवृत्ती !!!

Eoin Morgan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Eoin Morgan : इंग्लंडला विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार इऑन मॉर्गन लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची शक्यता आहे. इंग्लंडचा संघ सध्या आपल्या भूमीवर भारताविरुद्धच्या एका कसोटी सामन्या व्यतिरिक्त तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र जर मॉर्गनने निवृत्ती घेतली तर जोस बटलरला इंग्लंडचा नवा कर्णधार शकेल. हे लक्षात घ्या कि, मॉर्गनचा इंग्लंडच्या कसोटी संघात सहभागी नाही. तो इंग्लंडकडून फक्त एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटच खेळतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून मॉर्गन खराब फॉर्म मधीं जात आहे. नुकत्याच झालेल्या नेदरलँडविरुद्धच्या मालिकेतही त्याला दोनदा भोपळाही फोडता आलेला नाही.

Cricket: England captain Eoin Morgan troubled by World Cup win - 'It's not  fair to win like that' - NZ Herald

ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलिया विरोधात नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागल्यानंतर नुकतेच इंग्लंड संघात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. आता जो रूटच्या जागी बेन स्टोक्सला कसोटी संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. इंग्लंडला एकदिवसीय विश्वचषक मिळवून देणारा Eoin Morgan गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममधून जात आहे. गेल्या वर्षीच्या आयपीएल लिलावात त्याची निवड देखील झालेली नव्हती. गेल्या 28 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये आतापर्यँत मॉर्गनला फक्त दोनच अर्धशतके झळकावता आलेली आहे. त्यामुळे अशातच जर मॉर्गनने निवृत्ती घेतली तर यंदा तुफान फॉर्ममध्ये असलेला जोस बटलर कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर असेल.

Eoin Morgan Retirement: England's world cup winning captain to announce  International Retirement?

नेदरलँड विरुद्धच्या मालिकेपूर्वीच मॉर्गनकडून निवृत्तीचे संकेत देण्यात आले होते. यावेळी त्याने सांगितले होते कि,”जर मला वाटले की मी संघासाठी पुरेसे योगदान देऊ शकत नाही तर मी माझा डाव संपवेन.” 2015 च्या विश्वचषकापूर्वीच Eoin Morgan ने इंग्लंड संघाची धुरा सांभाळली होती. यावेळी अलिस्टर कुकच्या जागी एकदिवसीय संघाचे कर्णधारपद मिळाले. मात्र 2015 च्या विश्वचषकात इंग्लंडची कामगिरी चांगली झालेली नव्हती. यानंतर त्याने प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांच्यासोबत एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडचे रूप पालटवले.

Cricketers who played for multiple countries

हे लक्षात घ्या कि, मूळचा आयरिश असलेल्या Eoin Morgan चा जन्म आयर्लंड मधील डब्लिन येथे झाला. 2006 मध्ये त्याने आयर्लंड संघातून आपली आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरु केली. याच्या तीन वर्षांनंतर त्याला इंग्लंडच्या T-20 संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना मॉर्गनने 10,859 धावा केल्या आहेत.

हे पण वाचा :

Bank Holidays : जुलैमध्ये तब्ब्ल 14 दिवस बँका राहणार बंद, सुट्ट्यांची लिस्ट तपासा

Gold Price Today :सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे दर पहा

Adani Group च्या ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 100 टक्क्यांवर रिटर्न !!!

ind vs eng : टीम इंडियाचा धोखा टळला ! इंग्लंडचा ‘हा’ दिग्गज गोलंदाज टी 20, वन डे संघातून बाहेर

एकनाथ शिंदेंसाठी काय नाही केलं?? माझी 2 खाती त्यांना दिली; मुख्यमंत्र्यांचा निशाणा