हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली एक दमदार फलंदाज असून चांगला कर्णधार देखील आहे पण विराट च्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने अद्याप एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. येवडच नव्हे तर आयपीएल मधेही विराटच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाची कामगिरी देखील समाधानकारक राहिली नाही.
तर दुसरीकडे विराटच्या अनुपस्थित एकदिवसीय क्रिकेट मध्ये रोहित शर्मा आणि कसोटी मध्ये अजिंक्य रहाणे यांनी आपल्या कल्पक नेतृत्त्वाची चुणूक दाखवली आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या कर्णधार पदावर संकट येणार की काय अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
विशेषतः अजिंक्य रहाणेने कसोटी मालिका जिंकल्यापासून विराट ऐवजी अजिंक्यला कसोटी कर्णधार पद देण्यात यावे अशी जोरदार चर्चा सुरू आहे. याचदरम्यान इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसर याने एक आक्रमक वक्तव्य केले असून, त्यामुळे विराट कोहलीच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
मॉन्टी पानेसरने एक रोखठोक प्रतिक्रिया दिली असून , त्याच्या मते जर विराट कोहली वनडे विश्वचषक किंवा टी-20 विश्वचषक जिंकण्यात अयशस्वी ठरला तर त्याने आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा द्यावा. पानेसर म्हणाला, “हा वाद रंगतदार आहे. माझ्या मते रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्या कॉम्बिनेशनने उत्तम काम केले आहे. ज्यावेळी त्यां दोघांना संधी मिळाली त्यावेळी त्यांना त्याचा पुरेपूर फायदा उठवला आहे. त्यामुळे आता विराट कोहलीवर या दोन कर्णधारांना हाताळण्याची जबाबदारी असेल.”
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’