नवी दिल्ली । बचत खाते असो वा एफडी किंवा बँक लॉकर, त्यासाठी नॉमिनी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खातेधारकांचे नॉमिनी करणे आवश्यक आहे. EPF आणि EPS (Employee Pension Scheme) बाबतीतही नॉमिनेशन केले पाहिजे जेणेकरून EPFO सदस्याचा अकाली मृत्यू झाल्यास, नॉमिनी व्यक्तीला हा फंड वेळेत उपलब्ध करून देता येईल.
EPFO ने नॉमिनीची माहिती देण्यासाठी ई-नॉमिनेशनची सुविधा सुरू केली आहे. यामध्ये ज्यांचे नॉमिनेशन नाही, त्यांना संधी दिली जात आहे. त्यानंतर नॉमिनीचे नाव, जन्मतारीख यासारखी माहिती ऑनलाइन अपडेट केली जाईल.
7 लाख रुपयांची सुविधा मिळते
EPFO सदस्यांना एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI Insurance cover) अंतर्गत विमा संरक्षणाची सुविधा देखील मिळते. या योजनेत, नॉमिनीला जास्तीत जास्त 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. सदस्याचा कोणत्याही नॉमिनेशनशिवाय मृत्यू झाल्यास, क्लेमवर प्रक्रिया करणे अवघड होते. ऑनलाइन माध्यमातून तुम्ही नॉमिनी डिटेल्स कसे भरू शकता ते जाणून घ्या.
EPF/ EPS मध्ये ई-नॉमिनेशन कसे करावे ?
EPFO वेबसाइटवर जा आणि ‘सर्विसेज’ सेक्शनमध्ये ‘‘फॉर इंप्लॉइज’’ वर क्लिक करा.
आता ‘मेंबर UAN/ऑनलाइन सर्विस (OCS/OTCP)’ वर क्लिक करा.
आता UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
‘मॅनेज’ टॅबमध्ये ‘ई-नॉमिनेशन’ सिलेक्ट करा.
यानंतर स्क्रीनवर ‘प्रोवाइड डिटेल्स’ टॅब दिसेल, ‘सेव्ह’ वर क्लिक करा.
फॅमिली डिक्लेरेशन अपडेट करण्यासाठी ‘होय’ वर क्लिक करा.
आता ‘Add Family Details’ वर क्लिक करा. एकापेक्षा जास्त नॉमिनी देखील जोडले जाऊ शकतात.
नॉमिनी व्यक्तीचा वाटा किती असेल हे जाहीर करण्यासाठी ‘नॉमिनेशन डिटेल्स’ वर क्लिक करा. डिटेल्स एंटर केल्यानंतर, ‘सेव्ह ईपीएफ नॉमिनेशन ‘ वर क्लिक करा.
OTP जनरेट करण्यासाठी ‘ई-साइन’ वर क्लिक करा. आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल.
ओटीपी दिलेल्या जागेत टाकून सबमिट करा.