हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO कडून आपल्या सब्सक्रायबर्सना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत. EPFO च्या जवळपास सर्वच सेवा डिजिटल केल्या गेल्या आहेत. आता ग्राहकांना ऑनलाइन ई-नॉमिनेशनबरोबरच घरबसल्या ऑनलाइन नवीन UAN नंबर देखील तयार करता येईल. त्याचप्रमाणे, EPF अकाउंट बॅलन्स तपासणे आणि e-KYC देखील ऑनलाइन अपडेट करता येईल.
जर आपण नोकरी बदलली असेल तर पीएफ संबंधित काही महत्त्वाची माहिती समजून घेणे आपल्यासाठी महत्वाचे ठरेल. हे लक्षात घ्या कि, नोकरी बदलल्यानंतर PF चे पैसे नवीन कंपनीच्या पीएफ खात्यामध्ये ट्रान्सफर करावे लागतात. अन्यथा आपल्या पीएफ पासबुकमध्ये दोन वेगवेगळी खाती दाखवली जातील.
जर आपल्याला पीएफ खात्यातून मेडिकल किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी पैसे काढायचे असतील तर आधी जुन्या कंपनीचे पीएफ खाते नवीन कंपनीत विलीन करावे लागेल. तसे न केल्यास अनेक अडचणी निर्माण होतील.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने कडून युझर्सच्या सोयीसाठी आपल्या सर्व सर्व्हिसेस ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. विशेषत: कोरोनानंतर त्यामध्ये बरीच सुधारणा झाली आहे. EPFO स्वतः पूर्वीच्या कंपनीकडून सध्याच्या नियोक्त्याकडे पीएफचे पैसे ट्रान्सफर करण्याबाबत वेळोवेळी अपडेट जारी करत असते. नोकरदारांसाठीही EPFO ने एक सुविधा दिली आहे आहे. ज्यांतर्गत आता आपल्याला नोकरी बदलल्या नंतर आपला PF आधीच्या कंपनीतून सध्याच्या नियोक्त्याकडे ट्रान्सफर करता येईल.
पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करण्यासाठी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
EPF खाते ऑनलाइन ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला UAN नंबर पोर्टलवर जाऊन एक्टिव्हेट करावा लागेल. तसेच एक्टिव्हेशनसाठी वापरण्यात येणारा मोबाईल नंबरही एक्टिव्ह असावा. याशिवाय, कर्मचार्याचे बँक अकाउंट आणि IFSC कोड देखील UAN शी लिंक केले पाहिजे आणि कर्मचार्याचे e-KYC देखील नियोक्त्याने मंजूर केले पाहिजे.
ऑनलाइन पैसे ट्रान्सफर कसे करावे ते पहा
सर्वांत आधी EPFO च्या https://epfindia.gov.in/ युनिफाइड मेंबर पोर्टलवर जा.
इथे UAN आणि पासवर्ड सह लॉगिन करा.
आता ऑनलाइन सर्व्हिसेस या पर्यायावर जाऊन वन मेंबर–वन ईपीएफ अकाउंट (ट्रांसफर रिक्वेस्ट) वर क्लिक करा.
यानंतर, सध्याच्या पीएफ खात्याशी संबंधित तपशील पर्सनल डिटेल्ससह व्हेरिफाय करा.
पीएफ अकाउंटच्या डिटेल्सचे व्हेरिफिकेशन केल्यानंतर लास्ट पीएफ अकाउंट डिटेल्स पर्यायावर क्लिक करा.
फॉर्मचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी पूर्वीचा नियोक्ता किंवा सध्याचा नियोक्ता निवडा.
UAN वर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरील OTP साठी, Get OTP पर्यायावर क्लिक करा.
OTP टाका आणि सबमिट वर क्लिक करा. असे केल्याने, नियोक्त्याला EPF ट्रान्सफर ची माहिती देखील मिळेल.
तुमची कंपनी युनिफाइड पोर्टलच्या नियोक्ता इंटरफेसद्वारे तुमची EPF ट्रान्सफर रिक्वेस्ट मंजूर करेल.
हे पण वाचा :
कोणत्या बँकांमध्ये RD वर सर्वाधिक व्याज मिळत आहेत हे जाणून घ्या
Cyber Froud : ऑनलाइन अकाउंट्स आणि आर्थिक डेटा सुरक्षित कसा ठेवावा ??? अशाप्रकारे जाणून घ्या
खुशखबर !!! आता Yes Bank ने देखील FD वरील व्याजदरात केली वाढ
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 75 मध्ये फ्री कॉलिंग सहित मिळतोय 2.5GB डेटा !!!
Business Idea : सतत मागणी वाढणाऱ्या ‘या’ व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपये !!!