हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोकरी करत असताना अनेक लोक हे भविष्यातील आर्थिक नियोजन करून काही पैसे ठेवत असतात. यासाठी कर्मचारी हे भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO मध्ये दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करत असतात. कर्मचाऱ्यांची जेव्हा निवृत्ती होते. त्यानंतर ही रक्कम त्यांना निवृत्तीवेतन म्हणून दिली जाते. जेणेकरून त्यांची निवृत्ती झाल्यानंतर त्यांना आर्थिक अडचण भासणार नाही. याआधी कर्मचाऱ्यांनी कामाची कंपनी बदलल्यावर त्यांनी आतापर्यंत जमा केलेला पीएफ हा नवीन कंपनीकडे जमा करायला लागायचा. परंतु आता EPFOने (EPFO New Decision) त्यांच्या काही नियमांमध्ये बदल केलेला आहे. त्यांनी केलेल्या नियमानुसार आता कर्मचाऱ्यांना त्यांचा हा पीएफ ट्रान्सफर करावा लागणार नाही. या नवीन निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांचा त्रास आता कमी होणार आहे.
पीएफ ट्रान्सफर करताना कर्मचाऱ्यांना कोणत्या अडचणी यायच्या? | EPFO New Decision
कर्मचाऱ्यांना आपल्या कामाची कंपनी बदलल्यावर पीएफ नवीन कंपनीच्या पीएफ खात्यात जमा करावा लागायचा. त्यासाठी कर्मचाऱ्यांना वेगळा फॉर्म 31 भरावा लागायचा. त्यामध्ये युनिव्हर्सल अकाउंट नंबर असून देखील कर्मचाऱ्यांना त्यासाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागत होती. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जुन्या कंपनीतील पीएफ रक्कम ही कर्मचाऱ्याच्या नव्या कंपनीच्या पीएफ खात्यात जमा केली जायची. परंतु ही प्रक्रिया पार पडताना कर्मचाऱ्यांकडून अनेक चुका देखील व्हायच्या. त्यामुळे या प्रक्रियेत खूप वेळ जायचा. परंतु आता घेतलेल्या या नवीन निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची डोकेदुखी कमी होणार आहे.
EPFOने नक्की काय निर्णय घेतला?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO New Decision) संघटनेने त्यांच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केलेला आहे. तो म्हणजे आता कर्मचाऱ्यांना कामाच्या कंपनीत बदल केल्यामुळे जुन्या कंपनीच्या पीएफ खात्यातील पैसे नव्या कंपनीच्या पीएफ खात्यात आपोआप ट्रान्सफर होणार आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना कोणताही फॉर्म भरण्याची किंवा कागदपत्रांची पूर्तता करण्याची गरज नाही. यामुळे पीएफ थेट ट्रान्सफर केला जाणार आहे.
EPFO नक्की काय काम करते?
EPFOच्या नियमानुसार कर्मचाऱ्याला भविष्य निर्वाह निधी म्हणून कर्मचाऱ्याला त्याच्या पगारातून 12 टक्के रक्कम ही पीएफ खात्यात जमा करावी लागते. ही पीएफ खात्यात जमा केलेली रक्कम कर्मचाऱ्याला त्यांच्या निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून दिली जाते.