हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार कडून लवकरच एक आनंदाची बातमी मिळणार आहे. आता कर्मचाऱ्यांना PF वर मिळणाऱ्या व्याजासाठी वर्षअखेरपर्यंतची वाट पाहावी लागणार नाही. सूत्रांकडून मिळालेल्या बातम्यांनुसार, सणासुदीचा हंगाम सुरू होण्या आधीच सरकार सर्व PF खातेधारकांना व्याजाचे पैसे ट्रान्सफर करणार आहे. यासंदर्भात नुकताच एक प्रस्ताव देखील तयार गेला आहे. आता त्यावर फक्त अर्थ मंत्रालयाकडून शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.
अर्थ मंत्रालयाकडून शिक्कामोर्तब होणे बाकी
PF वर दिला जाणार व्याजदर अजूनही कमी आहे, त्यामुळे डिसेंबरपूर्वी तो जमा केले जाऊ शकेल. सध्या PF वर दिला जाणारा व्याज दर हा गेल्या 43 वर्षांतील सर्वात कमी व्याज दर आहे, त्यामुळे अर्थ मंत्रालयाकडून लवकरच यासाठी मंजुरी मिळू शकेल अशी अपेक्षा व्यक्त होते आहे. या मंजुरीनंतर, EPFO सदस्यांच्या PF खात्यात कधीही व्याज जमा होऊ शकते. याचा फायदा ईपीएफओच्या साडेसहा कोटींहून जास्त ग्राहकांना होणार आहे.
या महिन्यातच मंजुरी मिळण्याची अपेक्षा
मिळालेल्या बातमीनुसार, अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर 30 जूनपूर्वीच कधीही PF खातेधारकांना व्याजाचे पैसे ट्रान्सफर केले जातील. तसेच दसरा-दिवाळी आधीच EPFO व्याजाचे पैसे जमा करू शकते असेही म्हंटले जात आहे. मात्र, याबाबत EPFO कडून कोणतेही अधिकृत स्टेटमेंट करण्यात आलेले नाही किंवा सरकारने देखील कोणतीही घोषणा केलेली नाही. हे जाणून घ्या कि, PF चे व्याज हे साधारणपणे वर्षाच्या शेवटी जमा केले जाते. मात्र यावेळी डिसेंबरपर्यंत वाट पाहणार नाही.
आताचे व्याज गेल्या काही दशकांमधील सर्वात कमी
पीएफवर दिला जाणारा सध्याचा व्याज दर हा गेल्या अनेक दशकांतील सर्वात नीचांकी पातळीवर आहे. 2021-22 साठी EPFO कडून PF चा व्याज दर 8.1 टक्के निश्चित करण्यात आलेला आहे. 1977-78 पासून पीएफवरील हा सर्वात कमी व्याजदर आहे. यापूर्वी 2020-21 मध्ये पीएफवर 8.5 टक्के दराने व्याज दिले जात होते. इथे हे लक्षात घ्या कि, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये पीएफच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. 2019-20 मध्ये हा व्याजदर 8.65 टक्क्यांवरून 8.5 टक्के करण्यात आला होता.
पीएफचे पैसे अशा प्रकारे गुंतवले जातात
पीएफ खातेदारांच्या खात्यात जमा असलेले पैसे EPFO कडून अनेक ठिकाणी गुंतवले जातात. या द्वारे मिळणाऱ्या कमाईचा एक भाग खातेदारांना व्याजाच्या स्वरूपात दिला जातो. सध्या, EPFO डेट ऑप्शनमध्ये 85 टक्के गुंतवणूक करते. यामध्ये सरकारी सिक्युरिटीज आणि बॉण्ड्सचा देखील समावेश आहे तर उर्वरित 15 टक्के रक्कम ही ETF मध्ये गुंतवली जाते. हे जाणून घ्या कि, पीएफ वरील व्याज दर हे कर्ज आणि इक्विटीच्या कमाईच्या आधारावर ठरवले जाते.
अशा प्रकारे तपासा PF बॅलन्स
PF बॅलन्स कशी तपासायची: EPFO वेबसाइटवर जा. ‘आमच्या सेवा’ च्या ड्रॉपडाउनमधून ‘कर्मचाऱ्यांसाठी’ निवडा. यानंतर मेंबर पासबुकवर जा. आता UAN नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. पीएफ खाते निवडा आणि ते उघडताच तुम्हाला बॅलन्स दिसेल. SMS द्वारे बॅलन्स तपासण्यासाठी, ‘EPFOHO UAN ENG’ टाइप करून 7738299899 वर मेसेज पाठवा. तुम्हाला प्रत्युत्तरात बॅलन्सची माहिती मिळेल. याशिवाय Umang App वरूनही पीएफ बॅलन्स तपासता येईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://epfindia.gov.in/
हे पण वाचा :
Gold Price Today : सोने महागले तर चांदीमध्ये झाली घट, आजचे नवीन दर पहा
HDFC : ‘या’ कंपनीच्या होम लोनवरील व्याजदरात एका महिन्यात तिसऱ्यांदा वाढ !!!
EPFO : डिजीलॉकरवर आता उपलब्ध होणार EPFO च्या ‘या’ सुविधा
EPFO कडून पेन्शनधारकांना मोठा दिलासा, आता लाइफ सर्टिफिकेट कधीही सादर करता येणार
Bank Holidays : जूनमध्ये बँकांना 12 दिवस असणार सुट्टी !!! सुट्ट्यांची लिस्ट तपासा