अन धर्मेंद्र रडू लागले… पहा व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ईशा देओलने तिच्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ तिच्या विदाईच्या समारंभांतील आहे, जिथे लाल साडीमध्ये असलेली वधू असलेली ईशा सर्वांचा निरोप घेते आहे. ईशाने यावेळी सोन्याचे दागिने आणि लाल साडी घातलेली आहे. ईशाच्या विदाई झाल्यावर तिचे आई-वडील हेमा आणि धर्मेंद्र रडताना दिसतात, खासकरुन धर्मेंद्र हे मुलीला निरोप देताना मोठ्याने रडत असताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये ईशाचा पती भारत तख्तानी आणि धाकटी बहीण अहाना देओलही दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की ईशा विदाई घेण्यासाठी सज्ज आहे, आधी ती हसत असते पण मात्र जेव्हा वडील धर्मेंद्र रडतात तेव्हा ईशा देखील भावनिक होते आणि नंतर हेमा मालिनीला मिठी मारताना ती रडते. ईशाची धाकटी बहीण अहानाही यावेळी रडताना दिसली आहे. या व्हिडिओच्या शेवटी प्रत्येकाणे ईशाला आनंदाने दिला. व्हिडिओ पहा-


View this post on Instagram

 

#memoriesforlife Thanks & best wishes to u my dear @badalrajacompany ! U are fantastic at his job ???????? ♥️????

A post shared by Esha Deol (@imeshadeol) on May 20, 2020 at 3:02am PDT

 

ईशा देओल आणि भारत तख्तानी यांचे २०१२ साली लग्न झाले होते. ईशा आणि भारतला मिराया आणि राध्या या दोन मुली आहेत. ईशाला आई हेमा मालिनीसारखीच नृत्याची आवड आहे आणि ती प्रशिक्षित डान्सर आहे. ईशाने तिच्या आईबरोबर अनेकदा नृत्य सादर केले आहे. ईशाने २००२ साली ‘मेरे कोई दिल से पूछे’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. यानंतर ती धूम, एलओसी कारगिल, काल, नो एंट्री इत्यादी चित्रपटांमध्ये दिसली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.