मुंबई : हॅलो महाराष्ट्र – क्रिकेटच्या मैदानात अनेक मजेशीर प्रसंग घडतात. हे प्रसंग मॅचच्या निकालापेक्षा जास्त लक्षात राहतात. उदाहरणार्थ, दोन खेळाडूंमधील विनोद, मैदानातील फॅन्स आणि क्रिकेटपटूंमधील संवाद, प्रेक्षकांचे लक्षवेधी पोस्टर हे मॅच संपल्यानंतरसुद्धा अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. नुकत्याच एका मॅचमधील एका प्रसंगात चक्क अंपायरचा सहभाग आहे. मैदानातील अंपायरवर सामन्याची मोठी जबाबदारी असते. कारण अंपायरचा एक निर्णय मॅचचा निकाल बदलू शकतो. यामुळे अंपायरकडून कोणती चूक घडू नये म्हणून ते सतत प्रयत्न करत असतात. युरोपीयन क्रिकेट सीरिजमध्ये अंपायरच्या बाबतीत असाच एक मजेशीर प्रकार घडला आहे. या अंपायरची कृती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
काय आहे नेमका प्रकार ?
हा प्रसंग युरोपियन क्रिकेट सीरिजमधील आचेन रायझिंग स्टार विरुद्ध वीएफबी गेल्सनकर्चेन यांच्यातील लढतीमध्ये घडला आहे. या मॅचमध्ये गेल्सकर्चेनच्या बॅट्समनला आऊट देण्यासाठी अंपायरने इतका वेळ घेतला की त्यामध्ये बॉलरच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि तो निराश झाला होता.
Bowler: I bet my life on it, that's plumb! 😋
Scores, news, previews 👉 https://t.co/6PLADFbASj
FanCode ECS Germany Krefeld. 1000 matches this year. WELCOME TO #ECS21 @FanCode @Dream11 @cricket_germany pic.twitter.com/NEKExCU7Om
— European Cricket (@EuropeanCricket) May 20, 2021
गेल्सनकर्चच्या इनिंगमधील दुसऱ्याच ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. या सामन्यात बॉलरने बराचवेळ अपिल केले, तरीही अंपायरने आऊट दिले नाही. यामुळे बॉलर निराश झाला आणि तो परत बॉलिंगसाठी निघाला होता, आणि त्यावेळी अंपायरने आऊटचा निर्णय देण्यासाठी बोट वर केले. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.