हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनघाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्या वडिलांचे कोरोना संक्रमणामुळे काही दिवसांपूर्वी निधन झाले. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली होती. अश्विनीचे वडील प्रदीप कुमार महांगडे यांनी वयाच्या ५६व्या वर्षी अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. अश्विनी तिचे नाना अर्थात तिच्या वडिलांच्या अत्यंत जवळ होती. यामुळे त्यांची शिस्त आणि शिकवण तिच्या नसानसांत भिनली आहे. त्यांच्या निधनानंतर तिने शोक जरूर व्यक्त केला मात्र तरी नानांची लेक खचली नाही. तिने आपले दु:ख बाजूला सारत शेतकामाला हात घातला आहे. वडिलांना हळदीची विशेष आवड म्हणून तिने हळदीची लागवड सुरु केली आहे.
https://www.instagram.com/p/CP0X24OJczh/?utm_source=ig_web_copy_link
अश्विनीने शेतात काम करतानाचा तिचा एक फोटो इंस्टाग्राम सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यासोबत तिने लिहिले आहे की, शेतकऱ्याची लेक… जगणं सोडता येत नाही आणि लढणं थांबवता येत नाही. काही आठवणी जबाबदारीची जाणीव करून देत असतात त्यातलीच एक हळदीची लागवड व भुईंमुग काढणी. नानांचे हळदीवर विशेष प्रेम असायचे. नाना सोबत असल्याची जाणीव मला प्रत्येक गोष्ट करून देत असते. आयुष्यात येईल त्या परिस्थितीचा सामना करता आला पाहिजे, हीच नानांची प्रेरणा व शिकवण. अश्विनीची ही पोस्ट पाहून तुम्ही अनेकांना प्रोत्साहन देत आहात, तुम्ही आमची प्रेरणा आहात असे तिचे चाहते तिला सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत.
https://www.instagram.com/p/CPvaZpVJ1Zo/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेत्री अश्विनी महांगडेने तिच्या वडिलांच्या निधनानंतर अगदी काही दिवसानी इंस्टाग्रामवर वडिलांवर उपचार सुरु असतेवेळी तिला खासगी हॉस्पिटलमध्ये आलेल्या वाईट अनुभवाबद्दल संताप आणि नाराजी व्यक्त केली होती. तसेच तिने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना तुम्ही खासगी हॉस्पिटलला कोरोना सेंटर म्हणून पत्र देता त्या हॉस्पिटलचा मृत्यू दर वाढतोय हे गृहितच धरता का..? असा खडा सवालही केला होता. अश्विनी स्वतः समाजकार्यात अग्रेसर आहे. मात्र यातही वडिलांच्या शिकवणीचा ती सन्मान करते. अश्या अश्विनीचे गंभीर आणि खमके व्यक्तिमत्व खरोखरीच आजच्या पिढीसाठी एक आदर्श आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.