हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एका मोठ्या ब्रेकनंतर आता पुन्हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे चित्रीकरण सुरु झाले आहे. पुन्हा मालिकेचे चित्रीकरण सुरु झाल्यामुळे सर्वजण आनंदी असल्याचे पाहायला मिळते. मालिकेतील जेठालाल हे पात्र साकारणारे दिलीप जोशी यांनी एका मुलाखतमीध्ये बच्चन सरांना करोनाचा संसर्ग होऊ शकतो तर इतर कोणालाही होऊ शकतो असे म्हटले आहे.
नुकताच दिलीप जोशी यांनी मुंबई मिररला मुलाखत दिली. ‘आम्ही मालिकेचा प्रत्येक एपिसोड केवळ चार कलाकारांसोबत शूट करत आहोत. आम्ही क्रू मेंबर्स देखील कमी केले आहेत. कारण सेटवर जास्त लोकांमुळे करोनाचे संक्रमण होण्याची भीती वाटते. जर अमिताभ बच्चन सर यांनी इतकी काळजी घेऊनही त्यांना करोनाचा संसर्ग होऊ शकतो तर इतर कोणालाही करोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. खासकरुन कलाकारांचे चित्रीकरण सुरु असताना. कारण ते कॅमेरा समोर मास्क परिधान करु शकत नाहीत’ असे दिलीप यांनी म्हटले आहे.
तसेच चित्रीकरणाच्या वेळी थोडी भीती वाटते असे देखील त्यांनी म्हटले आहे. ‘सेटवरचे संपूर्ण वातावरण बदलले आहे. आम्ही ११ जुलैपासून सकाळी ८ वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चित्रीकरण करत होतो. जवळपास १० तास’ असे त्यांनी पुढे म्हटले आहे.