औरंगाबाद | कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने शहरामध्ये शनिवार आणि रविवार कडक लॉकडाऊन लावला आहे. मुख्यमंत्र्यांनी रात्री लॉकडाऊनचा इशारा दिला असला तरी आज शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ चांगलीच दिसून आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी अंशतः लॉकडाऊन आणि शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या दोन आठवड्यामध्ये नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद दिसून आला असला तरी आज शेवटच्या आठवड्यामध्ये मात्र नागरिकांची रस्त्यावर फिरण्याची आणि वाहनांची वर्दळ जास्त दिसून येत आहे.
तसेच शहरामधील काही भागातल्या चहाच्या टपऱ्यासुद्धा चालू असल्याचे दिसून आले आहे. प्रशासनाने एवढ्या कारवाया करून सुद्धा लोक गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून आले आहे. म्हणूनच प्रशासनाला अजून कडक पाऊले उचलावे लागतील, असेच दिसून येते.