औरंगाबाद । “ठाकरे सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा-विदर्भ नाहीच. नवीन सरकारने औरंगाबादच्या निधीलाही स्थगिती दिली. समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं नाव दिल्यामुळे ते काम सुरु आहे, असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारला लगावला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार शिरीष बोराळकर (Shirish Boralkar) यांच्या प्रचारासाठी फडणवीस औरंगाबादमध्ये आले होते त्यावेळी ते बोलत होते.
“मागच्या वेळी गोपीनाथ मुंडे गेल्यामुळे भाजपचा पराभव झाला, मात्र शिरीष बोराळकर यांनी चांगली मतं घेतली होती. यावेळी मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही चंग बांधला आहे. मराठवाडा आणि विदर्भाचं चित्र बदलल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास होणार नाही” असं फडणवीस म्हणाले. “केंद्राच्या निधीतून आम्ही विकास केला, मराठवाड्याशी संबंधित दोन योजना दिल्या, यात मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजनाही होती. पण या योजनेला सरकारने स्थगिती दिली आहे. ते काम ठप्प आहे. समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी बकेटमध्ये आणण्यासाठी योजना केली, निधीची तरतूद केली, पण तेही काम बंद पडलेलं आहे” असं फडणवीस म्हणाले.
“मराठवाड्यातील दुष्काळामुळे शेतकरी आणि इंडस्ट्रीवर परिणाम होतो. सह्याद्रीचे पाणी आणले तर दुष्काळ संपू शकतो. औरंगाबादसाठी 1680 कोटी आम्ही पाण्यासाठी दिले. शहरातील रस्त्यांसाठी खूप निधी दिला, आता रस्ते तयार झाले. नवीन सरकारने औरंगाबादच्या निधीलाही स्थगिती दिली. समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिल्यामुळे ते काम सुरु आहे” असा टोला फडणवीसांनी लगावला.
“या सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा नाहीच. मराठवाडा आणि विदर्भाला पैसे देण्याचं राज्यपालांचे बंधन या सरकारने संपवले आहे. त्यामुळे मराठवाड्यावर अन्याय होईल” अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या. “पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार पदवीधरांचे प्रश्न मांडण्याऐवजी मुंबईच्या एसआरएचे प्रश्न मांडताना दिसतात” असा घणाघातही फडणवीसांनी केला. (Devendra Fadanvis taunts Samruddhi Mahamarg work under progress as it was named after Balasaheb Thackeray)
सत्ता गेल्याने चंद्रकांत पाटलांच्या डोक्यावर परिणाम झाल्याने खुळ्यासारखं बडबडतयात; हसन मुश्रीफ यांचा हल्लाबोल
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/nCzy32BLyi@ChDadaPatil @BJP4Maharashtra @mrhasanmushrif @INCMaharashtra @NCPspeaks #politicalnews— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’