अकलूज प्रतिनिधी |अकलूजचे एवरेस्ट वीर निहाल बागवान यांचे एवरेस्टच्या बेस कॅम्पमध्ये निधन झाले होते. त्यांचा मृतदेह मायदेशी परत आणण्यासाठी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिफारस केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या बाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आणि राज्य सरकारने १ कोटी २० लाख रुपये खर्च करून निहाल बागवान यांचा मृतदेह मायभूमीत आणला आहे.
२३ मे रोजी निहाल बागवान यांनी एवरेस्ट शिखर सर केले. त्यानंतर त्यांनी परतीचाप्रवास सुरु केला. या प्रवासा दरम्यान यांचा ऑक्सिजनच्या कमतरते मुळे मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह भारतात अणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोठे प्रयत्न केले. अखेर काल नेहलचा मृतदेह त्यांच्या राहत्या गावी म्हणजे अकलूज या ठिकाणी आणण्यात आला. त्यानंतर अकलूजकरांनी मोठ्या शोकाकुल वातावरणात निहाल बागवान यांना अखेरचा निरोप दिला.
दरम्यान राज्यसभेचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी निहाल बागवान यांच्या घरी जावून कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी शोकाकुल कुटुंबीयांचे रणजितसिंहांनी सांतवन केले. सहसा एवरेस्ट वीरांचे शिखर चढताना किंवा उतरताना आकस्मित निधन झाले तर त्याच्या पार्थिवाला अंतिम संस्कार मिळतीलच असे नाही. अनेक एवरेस्ट वीरांचे मृतदेह एवरेस्ट शिखरावर तसेच पडून राहतात. मात्र निहाल बागवान यांच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परता दाखवल्याने त्यांच्या कुटुंबाला त्यांचा मृतदेह मिळाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.