हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यासाठी फक्त आयोध्यातच नाही तर संपूर्ण देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. मुख्य म्हणजे, अयोध्येत प्रभू राम यांचे दर्शन घडवण्यासाठी 25 जानेवारी ते 25 मार्चपर्यंत मोहीम चालवली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत एका दिवसामध्ये सुमारे 50 हजार भक्तांना रामाचे दर्शन घेता येणार आहे. तसेच या 50 हजार लोकांच्या राहण्याची सोय देखील भाजपकडून करण्यात आले आहे.
राम मंदिरामध्ये श्रीप्रभू राम यांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर हजारोच्या संख्येने लोक दर्शनासाठी येणार आहेत. यासाठी जादा रेल्वे सोडण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. खास म्हणजे, 22 जानेवारी रोजी अयोध्येत दिवाळीसारखे वातावरण निर्माण करण्यात येणार आहे. याकाळात अनेक भाविक रामाचे दर्शन घेण्यासाठी आयोध्येत गर्दी जमवतील. त्यामुळे या सर्व लोकांची सोय माझ्याकडून करण्यात येणार आहे.
नुकतीच भाजपची नियोजना संदर्भात एक विशेष बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये भाविकांसाठी कोणत्या सुविधा राबवल्या जातील? त्यांच्या जेवणाची सोय कशी असेल? या सर्व गोष्टींवर नियोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्येच, सर्व लोकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे, कोणतेही असुविधा होऊ नये, तसेच कोणत्याही प्रकारचा भेदभाव घडता कामा नये, यासाठी सर्व काळजी घेण्यात यावी अशा सूचना भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी भाजपा प्रत्येक बूथ लेव्हलवरून कार्यकर्त्यांना राम मंदिराचे दर्शन घडवणार आहे. यासाठीच 25 जानेवारी ते 25 मार्चपर्यंत विशेष मोहीम राबवली जाईल. या मोहिमेंतर्गतच भाजप कार्यकर्त्यांना राम मंदिराचे दर्शन घडवण्यात येईल. तसेच एका दिवसामध्ये सुमारे पन्नास हजार लोकांना राम मंदिराचे दर्शन घेता येईल अशी व्यवस्था देखील भाजपकडून करण्यात आले आहे.