सर्वांना माहित असतं आपला फोन टॅप केला जातो, पण मी त्याला गांभीर्याने घेत नाही – शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजप सरकारच्या काळात नेत्यांच्या फोन टॅप केल्याचा गौप्यस्फोट केला होता. तर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी यासंदर्भातील पुरावे गृहमंत्रालायकडे आल्यामुळेच कार्यवाही तातडीने करावी लागेल असं मत व्यक्त केलं. दरम्यान आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोन टॅपिंग प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

एनआयला दिलेल्या मुलाखतीत पवार म्हणाले की, ”सर्वांना माहित असत की आपला फोन टॅप केला जात आहे, म्हणून आम्ही त्याबद्दल गांभीर्याने विचार करीत नाही. माझ्या माहितीनुसार, फोन टॅपिंगचे आदेश राज्यातील मंत्र्यांद्वारे देता येणार नाहीत, म्हणून राज्यातील मंत्र्यांना याबद्दल किती माहिती आहे हे मला ठाऊक नाही.” असं म्हणत पवार यांनी फोन टॅपिंग प्रकरणाबाबत केंद्रातील भाजप सरकारकडे अप्रत्यक्ष इशारा केला.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री जाहीर

धक्कादायक ! दीड कोटींच्या विम्यासाठी स्विफ्ट गाडीसह मित्राला जाळलं, साताऱ्यातील घटना

तरुणांवर तलवारीने हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेच्या माजी नगरसेवकास अटक

Leave a Comment