CBI चे माजी संचालक अश्विनी कुमार यांची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शिमला | सीबीआयचे माजी संचालक अश्वनी कुमार यांनी आपल्या शिमला येथील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. अश्विनी कुमार यांनी मणिपूर नागालँडचे गव्हर्नर म्हणून देखील जबाबदारी सांभाळली होती.

अश्विनी कुमार यांच्या आत्महत्येबाबत शिमल्याचे पोलीस अधिकांश मोहित चावला यांनी एका नामांकित वृत्तसंस्थेला माहिती दिली. अश्विनी कुमार पोलीस अधिकाऱ्यांसाठी आदर्श होते त्यांचा मृत्यू अशाप्रकारे होणं ही घटना अत्यंत दुःखद आहे, अशी प्रतिक्रिया मोहित चावला यांनी दिली.

दरम्यान, अश्विनी कुमार हे गेल्या काही दिवसांपासून नैराश्याचा सामना करत होते अशी माहिती आहे.