परीक्षा होणारच, विद्यार्थ्यांनी काळजी करु नये; राजेश टोपेंची विद्यार्थ्यांना ग्वाही

rajeh tope
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांच्या लेखी परीक्षेतील गोंधळामुळे अखेर ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत परीक्षा होणारच असून विद्यार्थ्यांनी काळजी करु नये असा विश्वास राजेश टोपे यांनी दिला.

कंपनीने असमर्थतता दाखवल्यामुळे दुसरा पर्याय आमच्याकडे नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी यांच्याबरोबर रात्री उशीरापर्यंत चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत आहे. असे राजेश टोपे म्हणाले.

या प्रकाराचा आरोग्य विभागाशी थेट संबंध नसला तरी आम्ही उद्याच बैठक घेऊन तारीख सर्व परिक्षार्थ्यांना कळवली जाईल. काळजीचं काही कारण नाही. परीक्षा रद्द झालेली नाही, परीक्षा नियोजित पद्धतीने होणारच आहे असं राजेश टोपे यांनी म्हंटल.