महामार्गालगतच्या सर्विस रस्त्यावर वाहतूक कोडी अन खुदाईचा बट्ट्याबोळ…

Karad Service Road
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड येथील कोल्हापूर नाक्याकडे जाणाऱ्या पुणे बंगळूर महामार्गालगतच्या सर्विस रस्त्याकडेला खुदाई केल्यामुळे आणि त्यातच गाळ मिश्रीत पाणी रस्त्यावर पसरल्याने खुदाईचा बट्याबोळ झालेला आहे. खुदाईमुळे रस्त्यावर सर्वत्र नाल्यातील पाणी पसरले असून वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी सध्या ठेकेदार खुशाल तर वाहनचालकांचे हाल पहायला मिळत आहेत.

कराडपासून काहीच अंतरावर महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रस्त्यावर ठेकेदाराकडून खुदाई करण्यात आलेली आहे. या ठिकाणी अगोदरच सर्विस रस्त्यावर खुदाई केल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. अशात मालवाहतूक करणारे ट्रकही याच ठिकाणी लावले जात आहेत. त्यामुळे इतर वाहने अडकून पडत आहेत.

या ठिकाणी करण्यात आलेल्या खोदकामातून गाळ मिश्रीत पाणी रस्त्यावर पसरत आहे. त्यामुळे दुचाकी वाहनेही घसरूप पडत आहेत. एवढेच नाही तर संबंधित गाळ हा इतर व्यवसायिकांच्या दुकानासमोर पसरल्याने गेली दहा ते पंधरा ददिवसांपासून काही व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. या ठिकाणी पसरलेल्या खुदाईतील गाळामध्ये तसेच पाण्यात एखादा दुचाकीस्वार घसरून पडल्यास तसेच त्याचा जीव गेल्यानंतर ठेकेदार जागा होणार का? असा संतप्त सवाल वाहनचालकांकडून केला जात आहे.