Excess Salt Side Effects | आजकाल बदलत्या जीवनशैलीनुसार आपल्या आरोग्या संबंधित देखील अनेक तक्रारी वाढलेल्या आहेत. अशातच काही डॉक्टरांनी एक संशोधन केले आहे आणि या संशोधनात असे आढळून आले की, उत्तर भारतातील लोक हे गरजेपेक्षा जास्त मीठ खात आहेत. WHO च्या संशोधनानुसार आपल्या अन्नामध्ये मिठाचे प्रमाण हे 5 ग्रॅमपर्यंत असले पाहिजे. यावेळी त्यांनी पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा जम्मू-काश्मीरमधील लोकांवर संशोधन केले. त्यावेळी असे आढळून आले की, या ठिकाणी अनेक लोक हे मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेले लोक आहेत. त्यांपैकी 65 टक्के लोक हे चार पट जास्त मीठ खातात (Excess Salt Side Effects). त्यामुळे त्यांना विविध लोकांचा प्रादुर्भाव झालेला आहे.
जास्त मीठ खाल्ल्याने होतो रोगाचा धोका
जास्त प्रमाणाच्या बाहेर जर आपण मिठाचे सेवन केले, तर आपल्याला रक्तदाब, मेंदूचा झटका, हृदयविकाराचा झटका, मित्रपिंडाच्या आजाराचा धोका वाढतो. उत्तर भारतातील लोकांच्या जीवनात मिठाचे प्रमाण जास्त असते. त्याचप्रमाणे प्रथिने आणि पोटॅशियमचे प्रमाण खूपच कमी असल्याचे समोर आलेले आहे. सर्वात जास्त प्रथिने हे बाजरीमध्ये असतात. त्यामुळे एका माणसाला दिवसभरात 3.50 ग्रॅम पोटॅशियम आवश्यक असते. परंतु उत्तर भारतातील लोकांच्या जेवणामध्ये ते निम्मेही नसते
फॉस्फरस हाडे कमकुवत करतात | Excess Salt Side Effects
या संशोधनात अशा आढळून आले आहे की, त्यांच्या अन्नामध्ये फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्यांची हाडे कमजोर होतात. एका दिवसात 7000 मायक्रोग्राम फॉस्फरस आवश्यक आहे. यापेक्षा जास्त सेवन केल्याने तुमच्या धमन्या, हृदय, डोळ्यांमध्ये समस्या निर्माण होतात.
हृदयविकाराचा धोका
जेव्हा आपल्या शरीरामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त होते. त्यावेळी शरीर ते विरघळण्यासाठी पाणी साठू लागते. आणि त्या पेशीभोवती द्रव्य आणि रक्ताचे प्रमाण वाढते. रक्त पंप करण्यासाठी हृदयाचे काम वाढते. त्यामुळे लोकांना हृदयरोगाचा किंवा पक्षपाताचा धोका देखील वाढतो.
या रोगांचा धोका का वाढत आहे?
आजकाल लोक घरातील पौष्टिक जेवण जेवणापेक्षा बाहेरच्या गोष्टी जास्त खातात. त्यामुळे फॉस्फरस पोटॅशियम, सोडियम यांसारखे घटक आवश्यक प्रमाणात उपलब्ध होत नाही. त्यामुळे आजकाल अनेक रोगांचा प्रसार वाढत चाललेला आहे.
या गोष्टी देखील लक्षात ठेवा
- जेवणामध्ये मिठाचा वापर मर्यादित करा.
- जेवताना जास्त मीठ खाणे टाळा.
- निरोगी जीवन जगण्यासाठी अन्नामध्ये कार्बोहाइड्रस आणि प्रथिने पुरेशा प्रमाणात असणे गरजेचे आहे.
- बाहेरचे अन्न खाण्याऐवजी घरी शिजवलेले अन्न खा
- तुमच्या आहारात भरडधान्य, कडधान्य, अंडी, बदाम यांसारख्या पोषक घटकांचा आवश्यक समावेश करा.