ठाकरेंचा भाजपला जोर का झटका; खासदार उन्मेष पाटलांनी बांधले शिवबंधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निडवणुकीच्या तोंडावर भाजपला महाराष्टात मोठा झटका बसला आहे. भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आज ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश (Unmesh Patil Joined Thackeray Group) केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि अनेक शिवसैनिकांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. जळगाव मध्ये भाजपने उन्मेष पाटील यांचे तिकीट कापलं होते. त्यामुळे ते काही दिवसांपासून पक्षावर नाराज होते. त्यानंतर काल त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली होती. अखेर आज त्यांनी थेट मातोश्रीवर जाऊन ठाकरेंचं शिवबंधन बांधलं आहे.

या पक्षप्रवेशावेळी बोलताना उन्मेष पाटील म्हणाले, मला उमेदवारी मिळालेली नाही म्हणून ही भूमिका घेतलेली नाही, भाजपने माझ्या विकासाची किंमत केली नाही. बदल्याचं राजकारण मनाला वेदना देणारं होतं . राजकारणात काम करताना मान सन्मान नको , पद नको, पण त्याचा स्वाभिमान सांभाळला जा नसेल अवहेलन केली जात असेल तर लाचार होऊन राजकारण करणं योग्य नाही, असं आपल्याला वाटत अशी प्रतिक्रिया उन्मेष पाटील यांनी दिली. ही पदाची, जय-विजयाची लढाई नाही तर ही स्वाभिमानाची, आत्मसन्मानाची लढाई आहे . एका भावाने दगा दिला असला तरी, दुसरा भाऊ शिवसेना माझ्यासोबत आहे, हा मला विश्वास असल्याने आपण शिवसेना ठाकरे गटात सामील होत असं म्हणत उन्मेष पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उन्मेष पाटील यांचे आभार मानले.

Jalgaon मध्ये भाजपला धक्का, Unmesh Patil यांचा कार्यकर्ता ठाकरेंकडून लोकसभा लढवणार? Smita Wagh

उन्मेष पाटील यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून लढताना तब्बल 713,874 मते मिळवली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांचा ३ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. आताही भाजप लोकसभेची उमेदवारी त्यांनाच देईल अशी शक्यता होती, मात्र भाजपने उन्मेष पाटील यांचे तिकीट कापत स्मिता वाघ याना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज होते. आता ठाकरे गटाकडून त्यांना तिकीट मिळाल्यानंतर जळगावात उन्मेष पाटील विरुद्ध स्मिता वाघ अशी हायवोल्टेज लढत पाहायला मिळेल.