Excess Water Side Effect | आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पिणे आहे धोकादायक; होतात या समस्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Excess Water Side Effect | आपल्या निरोगी आरोग्यासाठी पाणी पिणे खूप गरजेचे असते. पाण्याच्या कमतरतेमुळे आपल्या शरीराला अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे योग्य पद्धतीने पाण्याचे सेवन करणे खूप गरजेचे असते. आपल्या शरीरात जवळपास 50% पेक्षा जास्त पाणी आहे. डॉक्टरांकडूनही आपल्याला दररोज भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु जर तुम्ही रोज गरजेपेक्षा जास्त पाणी पिले (Excess Water Side Effect) , तर त्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका देखील निर्माण होऊ शकतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार एकाच वेळी भरपूर पाणी पिणे हे तुमच्या आरोग्यासाठी घातक असते.

जेव्हा आपल्या शरीरात गरजेपेक्षा जास्त पाणी असते. तेव्हा त्यात आपल्या शेजारी सोडियम वितळू लागतो. त्यामुळे आपल्या रक्तातील सोडियमची पातळी देखील कमी होते. आणि मेंदूचे पेशिंमध्ये यामुळे सूज येऊ शकते. ज्यामुळे शरीराच्या अवयवांना होणारा रक्त कुठे होता खंडित होऊ शकतो. ही एक अत्यंत दुर्मिळ अशी समस्या आहे. परंतु जर मर्यादा पेक्षा जर कोणी जास्त पाणी दिवसाला पीत असेल, तर त्यामुळे हा धोका निर्माण होतो आणि त्यातील इलेक्ट्रॉलाईट रक्तात पातळ होतात.

त्यामुळे आपल्या शरीरासाठी पाणी खूप गरजेचे असले, तरी एका नियंत्रणात ते पिणे खूप गरजेचे असतात. आपण नेहमीच लहानपणापासून अति तिथे माती ही म्हण ऐकत आलेलो आहोत.आणि तीच म्हण पाण्याला देखील लागू होते. म्हणूनच व्यक्तीला सामान्यपणे पाणी पिणे गरजेचे असते. दिवसाला किती पाणी प्यावे हे साधारण त्या व्यक्तीचे आरोग्य, लिंग, जीवनशैली आणि हवामान या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असते. यूएस नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स अँड इंजीनियरिंग मेडिसिनच्या मते पुरुषांनी दररोज 3.7 लिटर पाणी पिणे गरजेचे असते. तर महिलांसाठी दररोज 2.7 लिटर पाणी पिणे हे गरजेचे असते.