सातारा प्रतिनिधी । राज्यभरात रंगपंचमी विविध रंगांनी साजरी केली जाते. मात्र याच दिवशी सातारा जिल्ह्यातील बावधन हे गाव गुलाबी रंगानी न्हाहून निघते. कारण आहे या गावची ‘बगाड’ यात्रा..सध्या याच बगाड यात्रेवर कोराना व्हायरसचे सावट घोंगावल्यामुळे बगाड यात्रेला भाविकांची अल्पप्रमाणात गर्दी दिसून आल्याचं पाहायला मिळालं.
वाई तालुक्यातील ‘बावधन’चे बगाड हे राज्यात प्रसिद्ध आहे. हजारो भाविक दरवर्षी अनोखी बगाड यात्रा पाहण्यासाठी वाई गावापासून जवळच असणाऱ्या बावधन गावाला येत असतात. साडेतीनशे वर्षापासून या गावात ही यात्रा साजरी केली जाते. 20 फूट उंच बगाड गावापासून 5 किलोमीटर लांब असणाऱ्या सोनेश्वर मंदिरापर्यंत बैलांच्या मदतीने ओढले जाते.
यावर्षी 20 फुटी बगाडाला नवस फेडण्याचा मान मनोज नायकवडी यांना मिळाला असुन बगाड्या भक्तास २० फुटी लाकडी बगाडाला बांधले जाते. संपूर्ण लाकडापासून तयार केलेल्या बगाडाला शेतातून बैलांच्या जोडीनी ओढत पळवत नेऊन दोनच्या सुमारास या बगाडाचा कार्यक्रम आटपुन ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे.
बगाडाच्या सोहळ्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता प्रतिबंध करण्यात आले होते. भाविकांनी देखील या आजाराची धास्ती घेतली असून भाविकांनी तोंडावर मास्क, हातरुमालाचा वापर केलेला पहायला मिळालं.