Wednesday, March 29, 2023

रंगपंचमीचा कार्यक्रम सातारा पोलिसांनी काढला ‘धुवून’ ; कोरोनामुळे ‘धून टाक’ कार्यक्रमाचा फज्जा (व्हिडीओ)

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी । रंगपंचमी निमित्ताने साताऱ्यातील उत्साही युवक युवतींनी धुन टाक हा कार्यक्रम आयोजीत केला होता. या कार्यक्रमवर पोलिसांनी धडक कारवाई केली असून जागीच हा कार्यक्रम बंद करण्याच्या सूचना डीजेवाली टीम आणि सहभागी तरुणांना देण्यात आल्या. यावेळी डाॅल्बी सिस्टीमही जप्त करण्यात आली.

कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी सातारा पोलिसांनी कंबर कसली असून आज ‘धुन टाक’ या रंगपंचमी कार्यक्रमासाठी एकत्र जमलेल्या मुला-मुलींना आज हुसकावून लावण्यात आलं.

- Advertisement -

कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरुवारीच सार्वजनिक कार्यक्रम साजरे न करण्याचं आव्हान केलं होतं. या आवाहनाला न जुमाणणाऱ्या लोकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.