खळबळजनक ! धारदार शस्त्राने तरुणाची हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाला घातली चक्क अंघोळ

0
38
Murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शेतात वाचमन असलेल्या 25 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर मारेकऱ्यांनि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने घटनास्थळाला धुतले व मृतदेह घराबाहेर काढून मृतदेह देखील धुतल्याचा धक्कादायक प्रकार आज पहाटे पैठण तालुक्यातील धोरकीन गावातील शेतात समोर आला आहे. संदीप सूर्यभान साळवे वय-25 (रा.आंबेडकर नगर, औरंगाबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे.

या धक्कादायक प्रकरणी अधिक माहिती अशी की, मृत संदीप हा औरंगाबाद शहरातील आंबेडकरनगर भागातील रहिवाशी आहे. तो ढोरकीन येथील एका शेतात वाचमन म्हणूंन कामाला आहे. शेतात असलेल्या एका खोलीत तो राहत असे, आठवड्यातून किंवा पंधरवड्यातून तो औरंगाबादेत यायचा त्या सोबत शेतात अजून दोन तरुण राहायचे.

आज पहाटे शेतातून जात असताना नागरिकांना संदीप घराबाहेर पडलेला दिसला. व डोक्यावर गंभीर जखमा दिसून आल्या ही माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली.माहिती मिळताच एमआयडीसी पैठण पोलीस घटनस्थळी दाखल होऊन फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून पाहणी केली असता घर धुतलेल्या अवस्थेत आढळून आले तर काही ठिकाणी रक्त आढळून आले.तर मृतदेह देखील धुतलेले होते.आरोपीनी मध्यरात्रीच्या सुमारास संदीपची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली असावी व त्यानंतर पुरावा नष्ट करण्याचा हेतूने घरातील रक्त धुण्याचा प्रयत्न केला असावा व त्यानंतर मृतदेह घराबाहेर आणून मृतदेह धुण्यात आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन साठी रुग्णालयात हलविले आहे.या प्रकरणी एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकरी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस मरेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here