औरंगाबाद | शहरातील मोंढा नाका ते आकाशवाणी चौक दरम्यान आज सकाळी 9 ते 9:30 च्या सुमारास एका तरुणीने रिक्षातून उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
एकट्या तरुणीला पाहून रिक्षा चालकांचे हावभाव बदलले होते. त्याचे विचित्र हावभाव पाहून तरुणीने छेडछाड होण्याच्या भीतीने रिक्षा चालकाला रिक्षा थांबण्यास सांगितले. मात्र त्याने रिक्षा थांबवला नाही. यामुळे अपहरण व भितीपोटी तरुणीने रिक्षातून थेट उडी घेतली.
पहा व्हिडीओ
https://twitter.com/AurangabadHello/status/1431575221606264833?s=08
यामुळे ती किरकोळ जखमी झाली व घाबरल्या अवस्थेत तिने विरुद्ध दिशेला पाळायला सुरुवात केली. हा प्रकार अंबुलन्स हेल्प रायडरचे निलेश सेवेकर यांना लक्षात आला. त्यांनी तिला धीर दिला व तिच्या पालकांना बोलून घेतले. तोपर्यंत रिक्षा चालक पसार झाला होता. या घटनेचा तपास जिन्सी पोलिस करीत आहेत.