खळबळजनक ! ज्याला बांधली राखी त्यानेच केला अत्याचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात गुन्हेगारांचा बोलबाला दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील नूर कॉलनीत सख्या भावानेच बहिणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. ही घटना ताजी असतानाच आता निराधार असलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला पोलीस भरतीचे प्रशिक्षण देण्याचा बहाणा करून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे ही घटना 31 ऑगस्ट रोजी घडल्याचे पीडित मुलीने सांगितले त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरून पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात पक्ष कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अत्याचार करणाऱ्या आरोपीला या पीडितेने 24 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनानिमित्त राखी बांधली होती.

याविषयी अधिक माहिती अशी की, शहरात दोघी बहिणी राहतात. त्यामध्ये मोठी बहीण शहरातील खाजगी रुग्णालयात नोकरी करते. त्यांच्या आईचे 11 वर्षांपूर्वी तर वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. त्या दोघींच्या शेजारी त्यांचे चुलते राहतात. मोठ्या बहिणीच्या तीन मित्रांपैकी एक आरोपी रामदास प्रसाद याला दोघींनी भाऊ मानले होते त्यास 24 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनानिमित्त दोघींनी राखी देखील बांधले होते. तेव्हा ओवाळणीसाठी पैसे नसून, एक तारखेपासून लहान बहिणीला पोलीस भरतीचे प्रशिक्षण देतो. तसेच त्यासाठी ट्रॅकसूट आणून देतो असे आश्वासन देऊन आरोपी रामदास प्रसाद निघून गेला. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता पीडितेची बहीण ड्युटीवर असताना आरोपी ट्रॅक सूट घेऊन घरी आला, त्यास पीडिता नकार देत असताना मोठ्या बहिणीची बोलणे करून देत तिला प्रशिक्षणासाठी परिसरातील मैदानाकडे घेऊन गेला मैदाना जवळ आल्यानंतर पाऊस सुरू होताच एका चारचाकी वाहनाला हात धरून थांबवत त्यात बसून तिला पुंडलिकनगर ठाण्याच्या हद्दीमध्ये नेले त्या ठिकाणी एका रूममध्ये घेऊन जात व्यायाम करण्यास लावला. त्यानंतर काही वेळाने त्या नराधमांनी तिच्यावर अत्याचार केल्याचे पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी पुंडलिक नगर पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांचा सह तपास अधिकारी उपनिरीक्षक पवन यांनी मुलीचा इं कॅमेरा जवाब घेत पक्ष कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी –
नराधम आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करताना चे व्हिडिओ शूटिंग केली असून या घटनेची माहिती कोणाला दिल्यास हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान आरोपी व पीडितेला अत्याचार केलेल्या घटना स्थळापर्यंत अजय ठाकूर याने गाडीतून सोडली असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली.

आरोपी मुंबईतील रेकॉर्डवरील गुन्हेगार –
नराधम आरोपी रामदास प्रसाद हा मुंबईतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली. तो काही मित्रांसोबत भाड्याने रूम घेऊन राहत होता. त्याच्यावर इतरही अनेक गुन्हे दाखल असून त्याचाही तपास पोलिस करत आहेत.

Leave a Comment