सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
आज सकाळी सांगलीत बायपास रोडवर मोठ्या प्रमाणावर जनरिक औषधे उघड्यावर टाकल्याचे काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने याची कल्पना महापालिका प्रशासनास दिली. महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षक तसेच मुकादम यांनी तातडीने धाव घेत औषधांची पाहणी केली असता ती औषधे कालबाह्य झाल्याचे निदर्शनास आले.
त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना संपर्क साधत त्यांना याची माहिती दिली. सदर औषधे हि जेनेरिक असून ती कालबाह्य झाल्यानेच औषध विक्रेत्याने उघड्यावर टाकल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वास्तविक नियमाप्रमाणे अशी औषधे उघड्यावर टाकता येत नाहीत. टाकलीच तर त्याला नियमाप्रमाणे दंड भरवा लागतो अथवा त्याचे लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया आहे.
आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदर घडलेला प्रकार सांगितला. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ती औषधे जप्त केली . दरम्यान हि औषधे उघड्यावर कोणी टाकली? याचा शोध घेऊन संबंधित औषध विक्रेत्यांवरकठोर कारवाई करणार असल्याचे यावेळी अधिकऱ्यांनी सांगितले